Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

Gujarat incident : गुजरातमध्ये ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना घडली आहे. प्रसिद्ध यात्रेतील रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू झाला.
Gujarat news
Gujarat incident : Saam tv
Published On
Summary

पावगडमधील मंदिर परिसरात रोपवे तुटून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

रोपवेद्वारे बांधकाम साहित्य नेत असताना घडली दुर्घटना

मृतांमध्ये लिफ्ट ऑपरेटर आणि मजुरांचा समावेश

घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय

राज्यासहित देशभरात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. या धामधुमीदरम्यान गुजरातमध्ये दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यातील प्रसिद्ध यात्रा धाम पावगडमध्ये रोपवे तुटला. पावगडमधील मंदिराच्या परिसरात निर्माणाधीन इमारतीच्या बांधकामासाठी साहित्य नेणारा रोपवे तुटला. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २ लिप्ट ऑपरेटर, २ मजूर आणि अन्य दोघांचा समावेश आहे.

Gujarat news
Mhada 2025 : खूशखबर! मुंबई, नाशिकमध्ये म्हाडाची ६०० हून अधिक घरे उपलब्ध होणार; अर्ज कधी अन् कुठे करायचा? जाणून घ्या

मिळालेल्या माहितीनुसार, निर्माणाधीन इमारतीसाठी बांधकामाचं साहित्य पोहोचवणाऱ्या गुड्स रोपवे अचानक तुटला. रोपवे तुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने बचाव कार्य सुरु केलं. सर्व मृतदेहांना बाहेर काढण्यात आलं आहे.

Gujarat news
Eknath Shinde : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पडद्यामागं कोण होतं? एकनाथ शिंदे म्हणाले...VIDEO

रोपवे दुर्घटना नेमकी कशी घडली, याचा तपास सुरु करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीच्या आधारे, रोपवेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे बांधकामाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दुर्घटनेतील ६ जणांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

गुड्स रोपवे तुटला त्यावेळी ट्रॉलीत ६ जण होते. ट्रॉली चौथ्या मजल्यावर पोहोचल्यानंतर दुर्घटना घडली. उंचावरून ट्रॉली कोसळल्याने एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत २ लिफ्ट ऑपरेटर, दोन मजूर आणि २ अन्य लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांविषयी सविस्तर माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com