Mhada 2025 : खूशखबर! मुंबई, नाशिकमध्ये म्हाडाची ६०० हून अधिक घरे उपलब्ध होणार; अर्ज कधी अन् कुठे करायचा? जाणून घ्या

Mhada News : मुंबई, नाशिकमध्ये म्हाडाची ५०० हून अधिक घरे उपलब्ध होणार आहे. तर या घरांसाठी कधी आणि कुठे अर्ज करायचा, जाणून घेऊयात.
Mhada Lottery news
Mhada LotterySaam tv
Published On
Summary

म्हाडाने नाशिकमध्ये ४७८ आणि मुंबईतील टिळकनगरमध्ये १४४ घरे उपलब्ध होणार

नाशिकसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

टिळकनगरमधील १९ मजली इमारतीचं भूमिपूजन गुरुवारी होणार

घरे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी असून अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार

मुंबई आणि नाशिकमध्ये म्हाडाकडून ६०० हून अधिक घरे उपलब्ध होणार आहेत. नाशिकमध्ये म्हाडाने ४७८ घरांच्या विक्रीसाठी घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. तर मुंबईच्या टिळकनगरमध्ये म्हाडाची १४४ घरे उपलब्ध होणार आहेत. म्हाडाने घरांची उपलब्धता करून दिल्याने अल्प आणि मध्यम गटाच्या लोकांना फायदा होणार आहे.

Mhada Lottery news
Railway Accident : धावत्या रेल्वेचा भीषण अपघात, १५ जणांचा मृत्यू, परिसरात लोकांची धावाधाव

नाशिकमध्ये गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे ४७८ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ही सोडत म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते 'गो-लाईव्ह' कार्यक्रमातून जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीत गंगापूर, देवळाली, पाथर्डी, म्हसरुळ, नाशिक व आगर टाकळी शिवार या विविध प्रकल्पांतील घरे उपलब्ध होणार आहेत. सर्व घरे अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी राखीव ठेवण्यात आल्याची मिळाली आहे.

Mhada Lottery news
OBC Reservation : लक्ष्मण हाकेंनी सरकारविरोधात दंड थोपटले; आंदोलनातून आंदोलनाला प्रत्युत्तर देणार, VIDEO

सोडतीसाठी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा ३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत करता येणार आहे. यासाठी अनामत रक्कम भरण्याची अंतिम मुदत ४ ऑक्टोबर २०२५ आहे. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी जाहीर केली जाईल. सोडत प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक व संगणकीकृत पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे म्हाडा प्रशासनाने स्पष्ट केलंय. इच्छुक अर्जदारांनी फक्त म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा म्हाडा लॉटरी ॲपद्वारेच अर्ज करावेत, असेही आवाहन करण्यात आलंय.

Mhada Lottery news
Public Holiday 2025 : ईदनिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे की नाही? महत्वाची माहिती आली समोर

टिळकरनगरमध्ये म्हाडाची १४४ घरे

मुंबईतील चेंबूरमधील टिळकनगरमध्ये १४४ घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. १९ मजली इमारतीचं भूमिपूजन येत्या गुरुवारी होणार आहे. या इमारतीत अल्प गटासाठी ७४, मध्यम गटासाठी ७० घरे उपलब्ध असणार आहेत. भूमीपूजनानंतर बांधकामाला सुरुवात होईल. या इमारतीचं बांधकाम अडीच ते तीन वर्षात पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं चेंबूरमध्ये हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या घरांसाठी २०२६ मध्ये सोडत काढली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com