OBC Reservation : लक्ष्मण हाकेंनी सरकारविरोधात दंड थोपटले; आंदोलनातून आंदोलनाला प्रत्युत्तर देणार, VIDEO

Laxman Hake News : हैदराबाद गॅझेट लागू केल्याने जरांगेंनी आंदोलनाची तलवार म्यान केली.. मात्र आता सरकारने जीआर काढल्याने सरकारविरोधात लक्ष्मण हाकेंनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय.. नेमकी हाकेंनी आंदोलनाची कशी रणनीती आखलीय? पाहूयात...
 लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे
Hake vs Jarange Patil saam
Published On

हाकेंचा हा संताप आहे, मराठा आरक्षणासाठी सरकारनं काढलेल्या नव्या जीआर विरोधात... जरांगें पाटलांनी मंत्रिमंडळ उपसमितीकडून भरसभेत मागण्या वदवून घेतल्यानंतर ओबीसी समाजही आता आक्रमक झालाय.

एवढंच नाही तर हाकेंनी थेट मुख्यमंत्र्यांसह जरांगेंना मदत करणाऱ्या नेत्यांवरही बहिष्कार टाकण्याचं आवाहन ओबीसी समाजाला केलयं. GFX -त्यात खासदार बजरंग सोनावणे, आमदार अभिजीत पाटील, आमदार उत्तम जानकर, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयसिंह पंडित, खासदार कल्याण काळे, खासदार रविंद्र चव्हाण, माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, आमदार बाबासाहेब देशमुख याच्या नावाचा उल्लेख हाकेंनी केलाय.

 लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे
OBC Reservation : ठरलं! सरकारच्या 'जीआर'विरोधात कोर्टात जाणार; छगन भुजबळांकडून ओबीसी कार्यकर्त्यांना मोठं आवाहन

हाकेंचं आवाहन, 'त्या' नेत्यांवर बहिष्कार

हाकेंनी सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी संघर्ष यात्रा सुरु करणार असल्याची घोषणा केलीय. तसचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही त्यांनी खुलं आव्हान दिलयं...

 लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या उलट्या बोंबा; भारतावरच केला मोठा आरोप

आरक्षणाचा जीआर मिळाल्यानंतर जरांगेंनी तलावार म्यान केलेली असताना आता ओबीसींनी उपोषणाचं हत्यार उपसलंय. त्यामुळे हाकेंच्या आंदोलनामुळे सत्ताधाऱ्यांपुढे आणखी पेच निर्माण होणार आहे.. त्यामुळे आरक्षणाची न्यायालयीन लढाई ते ओबीसींची रस्त्यावरची लढाई यातून मार्ग काढण्यासाठी सरकारची कसोटी लागणार...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com