Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या उलट्या बोंबा; भारतावरच केला मोठा आरोप

Donald Trump News : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर हल्ला केला आहे. त्यांनी भारतावर मोठा आरोप केला आहे.
Donald Trump News
Donald Trump NewsSaam tv
Published On
Summary

डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर व्यापार टॅरिफबाबत जोरदार टीका केली

भारत सर्वाधिक टॅरिफ लावणारा देश असल्याचा आरोप

भारत आणि अमेरिकेतील व्यापार संबंधांमध्ये तणाव वाढल्याचे स्पष्ट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर व्यापारावरून हल्लाबोल केला आहे. अमेरिकेने भारतावर सर्वाधिक कर लावला आहे. दुसरीकडे भारताने 'झिरो टॅरिफ'ची ऑफर दिल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. चीन, ब्राझीलसारखं भारतही अमेरिकेवर भरघोस टॅरिफ लावत होता, अशी टीका ट्रम्प यांनी केली.

स्कॉट जेनिंग्स रेडियो शोमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, 'आम्हाला चीन टॅरिफने मारतो. तसाच ब्राझील आणि भारतही टॅरिफने मारतो. मला टॅरिफ चांगल्याप्रकारे कळलं आहे. भारत जगात सर्वात अधिक टॅरिफ लावणारा देश होता'. पण आता भारतात अमेरिकेला कोणताही टॅरिफ असणार नाही, असे त्यांनी सांगितल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

'भारताकडून लावण्यात येणाऱ्या टॅरिफमुळे सर्वाधिक टॅरिफ लावण्याचा विचार करावा लागला. भारतावर लावण्यात आलेला सर्वाधिक टॅरिफ लावल्याचा निर्णय योग्य असल्याचेही आहे, असेही ट्रॅम्प यांनी अधोरेखित केले.

Donald Trump News
IAS Transfers List : राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मालिका सुरुच; कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

'टॅरिफने अमेरिकेला व्यावहारिक सौदेबाजी करण्यास ताकद दिली. आम्ही भारतावर टॅरिफ लावला नसता तर त्यांनी आम्हाला कधीच टॅरिफची ऑफर दिली नसती. ट्रम्प यांनी आठवड्यात अनेकदा 'झीरो टॅरिफ'विषयी बोललं आहे. सोशल मीडियावर ट्रम्प यांनी भारत-अमेरिकेचा व्यापार एकतर्फी असल्याचा सांगितला आहे. भारत अमेरिकेत मोठ्या प्रमाणात वस्तूंची विक्री करतो. परंतु अमेरिका भारतात फार कमी वस्तूंची विक्री करतो'.

Donald Trump News
OBC Reservation : ठरलं! सरकारच्या 'जीआर'विरोधात कोर्टात जाणार; छगन भुजबळांकडून ओबीसी कार्यकर्त्यांना मोठं आवाहन

दोन्ही देशांमधील संबंध बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लागू केला होता. मात्र, काही दिवसांनी अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लागू केला आहे. अमेरिकेने ५० टक्के टॅरिफ लागू केल्यानंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे सुरु ठेवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com