OBC Reservation : ठरलं! सरकारच्या 'जीआर'विरोधात कोर्टात जाणार; छगन भुजबळांकडून ओबीसी कार्यकर्त्यांना मोठं आवाहन

OBC Reservation Update : सरकारच्या 'जीआर'विरोधात कोर्टात जाणार आहे. छगन भुजबळांकडून ओबीसी कार्यकर्त्यांना मोठं आवाहन केलं आहे.
OBC Reservation update
OBC Reservation Saam tv
Published On
Summary

छगन भुजबळ शासनाच्या जीआरविरोधात कोर्टात जाणार असल्याची भूमिका

देवगिरी बंगल्यावर ओबीसी आरक्षणाबाबत बैठक

छगन भुजबळांकडून ओबीसी कार्यकर्त्यांना आंदोलन थांबवण्याचं आवाहन

शासन निर्णयातील संभ्रम दूर करण्यासाठी कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरुये

मराठा आरक्षण आंदोलनानंतर सरकारच्या शासन निर्णयानंतर ओबीसी समाजामध्ये नाराजी पसरल्याचं दिसत आहे. ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीवरही बहिष्कार घातला. दुसरीकडे सरकारच्या शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी शासन निर्णयाविरोधात कोर्टात जाणार असल्याची भुमिका स्पष्ट केली. ओबीसी कार्यकर्त्यांना आंदोलन, उपोषण थांबवण्याचं आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केलं.

मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाची बाजू घेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांची देवगिरी बंगल्यावर महत्वाची बैठक झाली. छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठर पार पडली.

या बैठकीत शासन निर्णयाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्याचे ठरले आहे. त्यानुसार, ओबीसी नेत्यांकडून सरकारच्या शासन निर्णयाविरोधात सोमवारी किंवा मंगळवारी कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे. छगन भुजबळ यांनी भूमिका स्पष्ट केल्याने सरकारच्या शासन निर्णयाविरोधात ओबीसी समाजाचे नेतेही तीव्र भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

OBC Reservation update
OBC Reservation : मोठी बातमी! ओबीसी समाजासाठी उपसमितीची स्थापना; यादीत कोणत्या मंत्र्यांची वर्णी, वाचा

छगन भुजबळ म्हणाले, 'मराठा आरक्षणासंदर्भात एक जीआर जाहीर केला. या शासन निर्णयातील काही वाक्ये आणि शब्द याबाबत संभ्रम आहे. ओबीसी वर्गातील अनेक संघटना, अनेक नेत्यांनी राज्यात वेगवेगळ्या ठिकणी निवेदने दिली. काही ठिकाणी शासन निर्णय फाडत असल्याचे सुरु आहे. इतर ओबीसी नेत्यांशी चर्चा केली. आता गणेशोत्सव सुरु आहे. अनेकांच्या घरी गणपती असतात. दुसरीकडे काही जणांचं उपोषण सुरु आहे'.

OBC Reservation update
Shocking : थरारक! बलात्कार प्रकरणात मुसक्या आवळल्या; पण आमदाराने पोलिसांवरच गोळ्या झाडल्या, अंगावर गाडी घातली अन्...

'अनेक कायदेतज्ज्ञ, वकील आहेत. त्यांना सर्व कागदपत्रे देऊन यासंदर्भातील संभ्रम आहेत, त्याची माहिती घेत आहोत. त्यांचाशी निश्चित चर्चा करून कोर्टात जाण्याची तयारी आहे. आम्ही कायदेतज्ज्ञांशी चर्चा करत आहोत. ओबीसींच्या हक्कावर गदा येणार नाही, अशा प्रकारची मागणी शासनाकडे सुरु आहे. ते त्यांनी करावं. बाकीचे उपोषणाचे प्रकार आहेत. शासन निर्णय फाडत आहेत. हे आंदोलनाचे प्रकार त्वरीत थांबवावेत, अशी विनंती करत आहोत. ओबीसींचं नुकसान होत असेल तर हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com