Shocking : थरारक! बलात्कार प्रकरणात मुसक्या आवळल्या; पण आमदाराने पोलिसांवरच गोळ्या झाडल्या, अंगावर गाडी घातली अन्...

Punjab Shocking : बलात्कार प्रकरणात ताब्यात असलेल्या आमदारने पोलिसांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढल्याची घटना घडली.
Punjab aap mla News
Punjab aap mla Saam tv
Published On
Summary

बलात्कार प्रकरणात ताब्यात असलेला AAP आमदार हरमीत सिंग ढिल्लो पोलिसांवर गोळीबार

पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालून केलं गंभीर जखमी

आमदार फरार झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

वकील सिमरनजीत सिंग सग्गू यांच्याकडून पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित

पंजाबमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबच्या सनौरमध्ये बलात्कार प्रकरणात ताब्यात असलेला आम आदमी पक्षाचा आमदार पोलिसांवर गोळ्या झाडून फरार झाला आहे. आमदार फरार झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हरमीत सिंह ढिल्लो असे आमदाराचे नाव आहे.

पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाचा आमदार हरमीत सिंह ढिल्लो आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावरही गाडी घातली. त्यानंतर आमदार हरमीत हा साथीदाराच्या साथीने फरार झाल्याने पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली आहे.

पोलीस कर्मचारी जखमी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार हरमीत यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी चढवून फरार झाले आहेत. आमदार आणि त्यांचे साथीदर दोन वाहने घेऊन निघाले होते. पोलिसांना एका कारमधील त्यांच्या साथीदारांना पकडण्यात यश आलं. तर आमदार दुसऱ्या कारने फरार झाला. पोलिसांच्या पथकांनी त्यांचा तातडीने पाठलाग सुरु केला आहे.

Punjab aap mla News
Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

या थरारक घटनेनंतर आमदार हरमीत सिंह यांचे वकील सिमरनजीत सिंह सग्गू यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. वकील सिमरनजीत यांनी सांगितलं की, 'हरमीत सिंह यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला होता. हायकोर्टात हे प्रकरण प्रलंबित होतं. हे प्रकरण हायकोर्टाने निकाली काढून बड्या पोलीस अधिकाऱ्यांना चौकशीसाठी नेमलं होतं. मात्र, दोन दिवसात या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला. या एफआयआरमध्ये आणखी बलात्कार आणि कलम ४२० अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले'.

Punjab aap mla News
Maratha Reservation : मराठा आंदोलन हाताळण्याबाबत कोर्टाचे महत्वाचे आदेश; सरकारची कसोटी लागणार, वाचा स्पेशल रिपोर्ट

'पीडित व्यक्तीने आधी पोलिसांकडे लेखी तक्रार अर्ज दिला. त्यानंतर हायकोर्टात रिट याचिका दाखल केली. पुढे या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल कोर्टात सादर करण्यात आला. या तक्रारीत पीडित व्यक्तीने आमदार हरमीत सिंह यांच्यासोहत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे कबूल केले आहे, असे त्यांनी सांगितलं. या संपूर्ण प्रकरणानंतर वकील सिमरनजीत सिंह यांनी यंत्रणेच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com