Maratha Reservation : मराठा आंदोलन हाताळण्याबाबत कोर्टाचे महत्वाचे आदेश; सरकारची कसोटी लागणार, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maratha Reservation update : मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन तीव्र झाल्याने कोर्टाने आंदोलन हाताळण्याबाबत महत्वाचे निर्देश दिलेत. त्यामुळे आंदोलन हाताळताना सरकारची कसोटी लागणार आहे... मात्र कोर्टाने नेमके काय निर्देश दिलेत? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.....
Maratha Reservation News
Maratha ReservationSaam tv
Published On

मनोज जरांगेंनी आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार केलाय. मात्र आंदोलनाविरोधात सदावर्तेंनी हायकोर्टात धाव घेतली आणि यावरून जोरदार खडाजंगी रंगली.

आंदोलकांमुळे सामान्य मुंबईकरांचे हाल होताहेत.. एवढंच नाही तर कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन आरोप याचाकाकर्त्यांनी हायकोर्टात केला... त्यावर आदेशाच्या उल्लंघनाबाबत जरांगे आणि विरेंद्र पवारांना नोटीस पाठवली होती का? असा सवाल न्यायालयाने विचारला... यावेळी नोटीस पाठवली मात्र जरांगेंनी नोटीस स्वीकारली नाही. तसंच न्यायालयाच्या आदेशांचं पालन करण्याची हमी जरांगेंनी दिली होती, असा दावा महाधिवक्त्यांनी केला.

त्यानंतर आमरण उपोषणाची परवानगी नसताना परवानगी का दिली? असाच सवाल कोर्टाने विचारला. मात्र परवानगी मागताना आमरण उपोषणाचा उल्लेख नसल्याचा युक्तीवाद महाधिवक्त्यांनी केला. तर सरकारने नियमांचं पालन करुन कारवाई करावी, असंही कोर्टाने सुनावलं.. मात्र आंदोलनाबाबत कोर्टानेच आदेश द्यावेत म्हणत महाधिवक्त्यांनी हात झटकले. त्यावरुन कोर्टात चांगलीच खडाजंगी झाली.

Maratha Reservation News
Maratha Reservation : सत्ताधाऱ्यांचा आरोप, मराठा आंदोलनाला कुणाची रसद, गृहराज्यमंत्र्यांचा रोख नेमका कोणाकडे?

दरम्यान, आंदोलकांनी मुंबईतील रस्त्यांना खेळाचं मैदान बनवल्याचा युक्तीवाद सदावर्तेंनी केला. त्यानंतर आंदोलकांनी ब्लॉक केलेले रस्ते 24 तासात मोकळे करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. यावेळी आंदोलन हाताबाहेर गेल्याची टिपण्णी कोर्टाने केलीय. तर बाहेरुन येणाऱ्या आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच अडवण्याचे निर्देश कोर्टाने दिलेत.

Maratha Reservation News
Maratha Reservation : राणे कुटुंबावर हात टाकण्याची भाषा केली तर...; जरांगेंनी भावावर टीका केल्यानंतर निलेश राणे संतापले

गणेशोत्सवादरम्यान मुंबईत वाहतूक कोंडी होऊ नये, असंही कोर्टाने बजावलंय...दरम्यान जरांगेंच्या वकीलांनीही सरकारकडून वीज, पाणी, शौचालये बंद करुन आंदोलकांचे हाल केल्याचा आरोप केला.. त्यासंदर्भातही कोर्टाने आंदोलकांना सर्व सुविधा पुरवण्याचे आदेश सरकारला दिलेत.

Maratha Reservation News
Chhagan Bhujbal News: कुणबी नेमकं कोण? मनोज जरांगेंच्या आरक्षणाच्या मागणीवर छगन भुजबळांचा सवाल, VIDEO

दरम्यान, हुल्लडबाजी करणारे आंदोलक हे घुसखोर असल्याचा आरोप जरांगेंच्या वकीलांनी केलाय. तर कोर्टाच्या निर्देशाचं पालन करणार असून जनतेला वेठीस धरणाऱ्यांवर कारवाईचा इशारा सरकारनं दिलाय. मनोज जरांगेंच्या आंदोलनाची परवानगी ते मुंबईतील रस्त्यावरच्या आंदोलकांच्या मुद्द्यावर कोर्टाने थेट निर्देश दिल्याने सरकार नेमकी काय पावलं उचलणार? याकडे लक्ष लागलंय.. मात्र कोर्टाच्या आदेशाने कारवाई करताना आंदोलन चिघळणार नाही, याची सरकारने काळजी घ्यायला हवी.. अन्यथा मराठा आंदोलन चिघळणं सरकारला परवडणारं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com