Chhagan Bhujbal News: कुणबी नेमकं कोण? मनोज जरांगेंच्या आरक्षणाच्या मागणीवर छगन भुजबळांचा सवाल, VIDEO

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या आरक्षणाच्या मागणीवर छगन भुजबळ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जरांगेंच्या आरक्षणावरील वक्तव्याचाही भुजबळ यांनी समाचार घेतला.
Chhagan Bhujbal News
Chhagan Bhujbal Saam tv
Published On
Summary

मनोज जरांगे यांचा मराठा-कुणबी एकच असल्याचा दावा

मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंचा दावा फेटाळला

ओबीसी आणि मराठा समाजातील आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं

मुंबई : मराठा आंदोलकांनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी लावून धरल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावा करत मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या याच मागणीवर मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला आहे. मराठा-कुणबी एकच हा सामाजिक मुर्खपणा आहे. सर्व समाजाचे लोक शेती करतात, मग सगळे कुणबी आहेत का, असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

मुंबईत आज ओबीसी नेत्यांची बैठक झाली. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. प्रकाश शेंडगे, लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक नेत्यांनी बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांच्यावर टीका केली.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, 'काही वर्षांपूर्वी मराठा समाजाचे मोर्चे निघाले. गुजरातमध्ये पाटीदार समाजाचे मोर्चे निघाले. राजस्थानमध्ये गुर्जर समाजाचे मोर्चे निघाले. हरियाणात जाट समाजाचे आरक्षणासाठी मोर्चे निघाले. त्यानंतर ईडब्लूएस हा पर्याय समोर आला. केंद्र सरकारचा हा कायदा आहे. यात स्पष्ट केले की, जे दलित, आदिवासी, ओबीसी समाजात मोडत नाहीत. जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत. पण जे सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत. त्यांना ईडब्लूएस आरक्षण लागू होतं'.

Chhagan Bhujbal News
Solapur : सोलापुरात गॅस गळतीमुळे मोठी दुर्घटना; एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू, परिसरात हळहळ

'ईडब्लूएस आरक्षण लागू झाल्यानंतर १० टक्क्यांपैकी ८ टक्के फायदा हा मराठा समाजाच्या उमेदवारांनी घेतला. ईडब्लूएस आल्यानतंर पाटीदार, जाटांचं आंदोलन बंद झालं. तरीसुद्ध काही नेते ऐकायला तयार नाहीत. त्यानंतरही मराठा समाजासाठी एसईबीएसी आरक्षण दिलं. तरी ओबीसीतून आरक्षणाची मागणी का? असा सवाल भुजबळ यांनी केला.

Chhagan Bhujbal News
Jamnagar Tragedy : गणेश मूर्तीचं विसर्जन करताना पाण्याचा अंदाज चुकला; एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू

मराठा मागास नाही, भुजबळांनी दिला कोर्टाचा दाखला

उच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, 'मराठा आणि कुणबी असं म्हणणं हा सामाजिक मुर्खपणा आहे'. एका दुसऱ्या निकालात म्हटलं गेलं की, मराठा आणि कुणबी या वेगळ्या जाती आहेत'. प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर मराठा मागास नसल्याचे म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com