
लिस्बनमध्ये भीषण रेल्वे अपघात
केबल तुटल्यामुळे ट्रेन उलटून इमारतीला धडकली
या दुर्घटनेत १५ लोकांचा मृत्यू
पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली
Train Accident in Lisbon: पोर्तुगालच्या लिस्बनमध्ये भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे. या रेल्वे दुर्घटनेत १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १८ जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
केबल तुटल्याने रेल्वेचा ट्रॅकवरून तोल गेला. त्यानंतर ट्रेन उलटून इमारतीला आदळली. या भीषण दुर्घटनेत रेल्वेचा चक्काचूर झाला. तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवले. अपघातामुळे परिसरातील नागरिकांची एकच धावाधाव झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिक मदतीला धावले आहेत.
पोर्तुगालच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रमुख टियागो ऑगस्टो यांनी दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. भीषण दुर्घटनेतील मृतांमध्ये पोर्तुगालमधील नागरिक, परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. या मृतांमध्ये कोणत्याही लहान मुलांचा समावेश नाही, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
लिस्बनमध्ये सर्वात जुना रेल्वे मार्ग असल्याची माहिती मिळत आहे. ही रेल्वे स्थानिकांसाठी लाईफलाइन आहे. स्थानिक दररोज या रेल्वेतून प्रवास करतात. या रेल्वेच्या प्रत्येक डब्यात ४२ जण बसू शकतात.
आरोग्य मंत्रालयाचे प्रमुख टियागो ऑगस्टो यांनी सांगितलं की, 'रेल्वेचा अचानक अपघात झाल्याने अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात पादचारी लोकही जखमी झाले. रात्री साडे आठ वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरु होतं. अपघातानंतर जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लिस्बनचे महापौर कार्लोस मोएदास यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.