
मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि वर्षानुवर्षे खड्डयातल्या रस्तावरून करावा लागणारा प्रवास..त्यामुळे कोकणात जायचं म्हटलंतर निदान १० ते १२ तासांची निश्चिती... मात्र आता या त्रासातून तुमची सुटका होणार आहे. अवघ्या 5 तासांत तुम्हाला मुंबईतून थेट तळकोकणात जाता येणार आहे. भाऊचा धक्का वरुन निघालेली “एम टू एम” “प्रिन्सेस” बोट विजयदुर्ग बंदरात दाखल झाली. या बोटीची जयगड आणि विजयदुर्ग या ठिकाणी यशस्वी चाचणी घेण्यात आलीय.
मुंबईतून कोकणात कमी वेळेत येता येणार, असं बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं.
रो-रो सेवेचा मार्ग कसा असेल ते पाहूया
असा असेल रो-रो सेवेचा मार्ग
मुंबई (भाऊचा धक्का)
रत्नागिरी (जयगड बंदर)
सिंधुदुर्ग (विजयदुर्ग बंदर)
सध्या या रोरो सेवेचा केवळ रत्नागिरीत थांबा असला तरी भविष्यात मांडवा, श्रीवर्धन असे रायगड जिल्ह्यात दोन थांबे दिले जाण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव आणि होळीच्या वेळी मुंबई-गोवा महामार्गावर होणाऱ्या प्रचंड ट्रॅफिकपासून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
रो-रो सेवेची चाचणी यशस्वी
पाच तासात तळकोकणात
पर्यटनाच्या दृष्टीने फायदा होणार
रियाझ काझी, सरपंच, विजयदुर्ग
मात्र ही सेवा सर्वसामान्यांना परवडणारी आहे का ? हा कळीचा प्रश्न आहे कारण या रो-रोच्या तिकीटाच्या किंमती
फर्स्ट क्लास - 9,000 रुपये
बिझनेस क्लास - 7,500 रुपये
इकॉनॉमी क्लास - 2,500 रुपये
प्रीमियम इकॉनॉमी - 4,000 रुपये
मिनी बस - 13,000 रुपये
चारचाकी - 6,000 रुपये
दुचाकी - 1000 रुपये
सायकल - 600 रुपये
रो-रो सेवेचं हे भरमसाठ तिकीट कोकणवासीयांना परवडेल का ? हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे येत्या काळात रो-रो सेवेला कसा प्रतिसाद मिळतोय आणि पर्यटनवाढीच्या दृष्टीने त्याचा किती फायदा होतोय ते पाहणं महत्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.