IBPS SO Recruitment Saam Tv
naukri-job-news

IBPS Recruitment 2024: नॅशनल बँकेत अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; ८९६ पदांसाठी भरती सुरु;मिळणार भरघोस पगार; जाणून घ्या सविस्तर

IBPS SO Recruitment 2024: नॅशनल बँकेत अधिकारी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

तरुणांसाठी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट आहे. या नोकरीमध्ये अनेक विभागात ऑफिसर पदे भरली जाणार आहेत.

आयबीपीएसच्या भरतीमध्ये अॅग्रीकल्चर फील्ड ऑफिसर, मार्केटिंग ऑफिसर, आयटी ऑफिसर, लॉ ऑफिसर, राजभाषा अधिकारी अशा अनेक पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

आयबीपीएसच्या या भरतीमध्ये ऑफिसर या पदांसाठी ८९६ जागा रिक्त आहेत. ही भरती CRP SPL-XL 2025-26 अंतर्गत केली जाणार आहे. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ११ नॅशनल बँकेपैकी एका बँकेत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे नॅशनल बँकेत नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला प्रीलियम्स परीक्षा द्यावी लागणार आहे त्यानंतर मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेत पास झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीनंतर तुमची या नोकरीसाठी निवड केली जाईव.

या नोकरीसाठी प्रिलियम्स परीक्षा ही ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर मेन्स परीक्षा १४ डिसेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. यानंतर तुमची निवड केली जाणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ८५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये फी भरावी लागमार आहे.

या नोकरीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. आयटी ऑफिसरसाठी उमेदवाराने इंजिनियरिंग केलेली असावी. अॅग्रीकल्चर ऑफिसर पदासाठी बॅचलर्स डिग्री असणे गरजेचे आहे. इतर पदांसाठी संबंधित क्षेत्रातील डिग्री असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी निवड झाल्यास उमेदवारांना ५५ ते ६० हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्याचसोबत विविध भत्ते देखील देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

SCROLL FOR NEXT