RRB Recruitment 2024 : रेल्वेत मोठी भरती, 1376 पदे; पगार ₹ 44,000, अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी?

Indian Railway Jobs 2024 : रेल्वे विभागात नोकरीची सुवर्ण संधी! भारतीय रेल्वेने पॅरामेडिकल पदांसाठी भरती जारी केली आहे. नोंदणी लिंक कधी उघडेल? जाणून घ्या.
Indian Railway Jobs 2024
RRB Recruitment 2024SAAM TV
Published On

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने नवीन भरती जारी केली आहे. या अंतर्गत, पात्र उमेदवारांना पॅरामेडिकल पदांवर नियुक्त केले जाईल. या भरतीची नोटीस 5 ऑगस्टला जाहीर करण्यात आली. परंतु नोंदणी लिंक अद्याप उघडलेली नाही.

किती पदांची भरती?

रेल्वे विभागात नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 1376 पदांची भरती केली जाणार आहे. ही जागा विविध पदांसाठी आहे. जसे की - आहारतज्ञ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, डेंटल हाइजीनिस्ट, व्यावसायिक थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, ईसीजी तंत्रज्ञ, फील्ड वर्कर, ऑप्टोमेट्रिस्ट टेक्नीशियन, रेडिओग्राफर, तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक

कोण अर्ज करू शकतो?

या पदांसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा पदानुसार बदलते. वेबसाइटवर दिलेल्या नोटीसवर तुम्हाला त्याचे सविस्तर तपशील पाहायला मिळतील. संबंधित विषयात पदवी किंवा डिप्लोमा केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

निवड कशी होईल?

या पदांसाठी तिन्ही टप्प्यांत परीक्षा घेतली जाईल. या पदांसाठी निवड परीक्षेद्वारे केली जाईल. ज्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा घेता येईल, असे केवळ फॉर्ममध्ये नमूद करण्यात आले आहे. परीक्षेच्या सुमारे 10 दिवस आधी प्रवेशपत्र जारी केले जाईल. सीबीटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी फेरीसाठी उपस्थित राहावे लागेल. यानंतर वैद्यकीय चाचणी होईल. हे तिन्ही टप्पे पार करणाऱ्या उमेदवारांची निवड अंतिम असेल.

फी किती?

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, जनरल कॅटेगरी आणि ओबीसी उमेदवारांना 500 रुपये फी भरावी लागेल. एससी, एसटी, एक्स सर्विसमैन, महिला आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधील उमेदवारांना 250 रुपये भरावे लागतील.

Indian Railway Jobs 2024
SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी;विविध पदांसाठी सुरु आहे भरती;पात्रता आणि अर्ज कसा करायचा?

पगार किती?

या पदांसाठी निवड झाल्यास उमेदवाराला वेगवेगळ्या पदानुसार वेतन मिळेल. नर्सिंग सुपरिटेंडंट आणि परफ्युजनिस्ट पदांसाठी वेतन प्रति महिना 44900 रुपये आहे. याशिवाय बहुतांश पदांचे वेतन दरमहा 35400 रुपये आहे. पदानुसार, वेतन 29000 रुपये ते 25000 रुपये पर्यंत आहे. तसेच सर्वात कमी 19900 रुपये आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख काय?

आरआरबीने भरतीसाठी सूचना जारी करण्यात आली आहे. परंतु अर्जाची लिंक 17 ऑगस्ट 2024 रोजी उघडेल. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे. रेल्वे भर्ती बोर्डाच्या पॅरामेडिकल पदांसाठी फक्त ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट indianrailways.gov.in वर तुम्हाला अर्जाची लिंक मिळेल.

Indian Railway Jobs 2024
Ladki Bahin Yojana:'लाडकी बहीण' टेन्शनमध्ये! खूप प्रयत्न करूनही अर्ज भरताना येतोय एरर, आता पुढचा पर्याय काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com