Ladki Bahin Yojana:'लाडकी बहीण' टेन्शनमध्ये! खूप प्रयत्न करूनही अर्ज भरताना येतोय एरर, आता पुढचा पर्याय काय?

Ladki Bahin Yojana Application Options: लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ आहे. त्याआधी महिलांनी योजनेसाठी अर्ज दाखल करायचे आहेत.या योजनेत अर्ज दाखल करताना अनेक समस्या येत आहेत.
Ladki Bahin Yojana
Mukhyamantri Majhi Ladki Bahin YojanaSaam Digital
Published On

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जात आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महिला चिंतेत आहेत. परंतु अजूनही अर्ज भरण्यासाठी अवधी आहे. ३१ ऑगस्टपर्यंत तुम्ही अर्ज भरु शकतात. ऑनलाइन नाही तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज दाखल करु शकतात.(Ladki Bahin Yojana Application Mode)

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana Status: 'लाडकी बहीण'चा अर्ज बाद की मंजूर, कसं चेक करणार? स्टेप्स फॉलो करा!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही नारीशक्ती दूत अॅपवरुन (Narishakti Doot App)करु शकतात.तसेच सरकारने दोन वेबसाइट सुरु केल्या आहेत. मात्र, अनेकदा तांत्रिक कारणांमुळे हे फॉर्म सबमिट होत नाही. त्यामुळे महिलांना अर्ज दाखल करताना अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक महिला निराश झाल्या आहेत. मात्र, ३१ ऑगस्टपर्यंत महिला अर्ज दाखल करु शकतात. त्यामुळे तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी इतर अनेक मार्ग आहेत.

लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा अंगणवाडी सेविकांच्या मदतीने फॉर्म भरु शकतात.गावात ग्रामपंचायतीत जाऊन तुम्ही हा फॉर्म भरु शकतात.अनेक ठिकाणी लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी केंद्र उभारण्यात आले आहेत. तुम्ही या ठिकाणी जाऊन अर्ज भरु शकतात. (Ladki Bahin Yojana)

Ladki Bahin Yojana
PM Matru Vandana Scheme: गरोदर महिलांसाठी सरकारची खास योजना! मिळणार ६ हजार रुपयांची मदत; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही नारीशक्ती दूत अॅप किंवा https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवरुन तुम्ही अर्ज भरु शकतात. या वेबसाइटवर लोड आल्यामुळे किंवा काही तांत्रिक कारणांमुळे अर्ज सबमिट होत नाही. मात्र, काही काळानंतर तुमचे अर्ज सबमिट होऊ शकतात. अजून तुमच्याकडे जवळपास २०-२५ दिवसांचा कालावधी आहे. या काळात तुम्ही अर्ज दाखल करु शकतात.

Ladki Bahin Yojana
Lakhpati Didi Scheme: महिलांना व्यवसायासाठी मिळणार 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; लखपती दीदी योजना नक्की आहे तरी काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com