IOCL Recruitment Saam Tv
naukri-job-news

IOCL Recruitment: कामाची बातमी! इंडियन ऑइलमध्ये 1 लाख रुपयांच्या पगाराची नोकरी, अर्ज कसा करायचा? वाचा सविस्तर

Indian Oil Corporation Limited Recruitment: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांनी या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करा. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १ लाख रुपये पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी पाहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये नॉन एक्झिक्युटिव्हमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. इंडियन ऑइलमध्ये इंजिनियर, टेक्निशियन पदासाठई भरती सुरु आहे. जवळपास ४६७ रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२४ आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

इंडियन ऑइल लिमिटेड कॉर्पोरेशनमध्ये ज्युनिअर इंजिनियरिंग असिस्टंट, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, ज्युनिअर क्वालिटी कंट्रोल अॅनालिस्ट, इंजिनिअरिंग असिस्टंट, टेक्निकल अटेंडट पदासाठी ही भरती सुरु करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवाराने डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियरिंग, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअर, डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा असणे गरजेचे आहे. तसेच आयटीआय प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

१८ ते २६ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची मूदत सूट दिली जाईल. यासाठी संपूर्ण भारतात कुठेही नोकरी दिली जाईल.

या नोकरीसाठी निवड प्रक्रिया लेखी परीक्षा देऊन केली जाणार आहे. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.या नोकरीसाठी उमेदवारांना २५ हजार ते १ लाख ५ हजार रुपये पगार मिळणार आहे. याशिवाय महागाई भत्ता, पीएफ, वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहे. या नोकरीसाठी सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. याचा निकाल ऑक्टोबर महिन्यात जाहीर होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

SCROLL FOR NEXT