Manmad News: इंडियन ऑइल कंपनीत इंधन गळती; मराठवाडा, खानदेशात पंपावर जाणवणार तुटवडा

Nashik Manmad News : इंडियन ऑइल कंपनीत इंधन गळती; मराठवाडा, खानदेशात पंपावर जाणवणार तुटवडा
Manmad News
Manmad NewsSaam tv
Published On

अजय सोनवणे 

नाशिक : नाशिकच्या मनमाडजवळील नागपूरच्या इंडियन ऑइल कंपनीच्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर इंधनाची गळती सुरु झाली आहे. (Nashik) पहाटेच्या सुमारास प्रकल्पातील येणारे इंधन अतिदाबाने आल्याने पाईप लाईनला गळती झाली. अक्षर १० ते १५ मीटरपर्यंत इंधनाचे फवारे उडल्याचे प्रत्यक्षदर्शीने (Indian Oil) सांगितले. सुदैवाने यात कुठलीही जिवीत हानी झाली नाही. (Breaking Marathi News)

Manmad News
Bribe Trap: तलाठ्याला तीन हजाराची लाच घेणे पडले महागात

नाशिकच्या मनमाडजवळ इंडियन ऑइल कंपनीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी इंधनाला गळती लागली आहे. मोठ्या प्रमाणावर इंधन वाया गेले असून, या घटनेने संवेदनशील असलेल्या इंधन प्रकल्पाची सुरक्षा व्यवस्थाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेचा सुरक्षेचे कारण देत कंपनी प्रशासनाकडून (Manmad) अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. दरम्यान नागापूर ग्रामस्थांनी पोलीस स्थानकात निवेदन देवून चौकशीची मागणी केली आहे. 

Manmad News
Kalyan News : नदीत पोहण्यासाठी कल्याणहुन गाठली होती खडवली; हरवलेली तीन मुले कुटुंबियांच्या स्वाधीन

३०० हुन अधिक गाड्या उभ्या 

गळती झालेली पाईप लाईन दुरुस्तीसाठी दोन ते तीन दिवस लागणार असल्याचे कळते. या घटनेमुळे आज सकाळपासून इंडियन ऑइल प्रकल्पातून होणारी उत्तर महाराष्ट्रातील इंधन वाहतूक ठप्प झाल्याने मराठवाडा, खान्देशसह ७ ते ८ जिल्ह्यात इंडियन ऑइल पंपावर इंधन तुटवडा निर्माण होणार आहे. तर कंपनीच्या पार्किंगमध्ये ३०० पेक्षा जास्त गाड्या उभ्या राहिल्या आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com