Kalyan News : नदीत पोहण्यासाठी कल्याणहुन गाठली होती खडवली; हरवलेली तीन मुले कुटुंबियांच्या स्वाधीन

Kalyan News : नदीत पोहण्यासाठी कल्याणहुन गाठली होती खडवली; हरवलेली तीन मुले कुटुंबियांच्या स्वाधीन
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजीत देशमुख
कल्याण
: शाळेत जाण्याच्या बहाण्याने दुपारच्या सुमारास घरातुन तीन मुलं निघाली. मात्र रात्र उलटली तरी घरी परतली नाही. (Kalyan) कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र मुलं काही सापडली नाहीत. आज सकाळच्या सुमारास चिमुकल्यांच्या आई वडिलांनी महात्मा फुले पोलीस (Police) स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी शोध घेतला असता ही मुलं खडवली रेल्वे स्टेशन परिसरात सापडली. (Tajya Batmya)

Kalyan News
Hingoli News : हिंगोलीत कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरात विजय थोमर हे कुटुंबासह राहतात. त्यांना दोन मुली व दोन मुलं आहेत. चारही मुलं  लहान आहेत. त्यांची मुलं जोशीबाग परिसरातील एका शाळेत शिकतात. दरम्यान १९ ऑक्टोम्बरला दुपारच्या सुमारास त्यांचे तीन मुलं शाळेत जातो असे सांगत घराच्या बाहेर गेले. ते सायंकाळ उलुटूनही घरी परतले नाहीत. यामुळे विजय व त्याच्या कुटुंबाने या मुलांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र मुलं सापडली नाही. अखेर आज विजय यांनी महात्मा फुले पोलीस ठाणे (Kalyan Police) गाठत मुलं हरवल्याची तक्रार नोंदवली. 

Kalyan News
Bribe Trap: तलाठ्याला तीन हजाराची लाच घेणे पडले महागात

सीसीटीव्हीद्वारे शोध 

गांभीर्य ओळखून डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याण घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पोलीस अधिकारी किरण भिसे, स्वाती जगताप, सूचित टिकेकर, रवींद्र हासे, सुमित मधाळे, आनंद कांगरे यांच्या पथकाने शोध सुरू केला. कल्याण शहरासह रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. कल्याण रेल्वेस्टेशन परिसरात ही तिन्ही मुलं आसनगावच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसताना दिसून आली. पोलिसांनी एक पथक खडवलीच्या दिशेने रवाना झाले. खडवली स्टेशन परिसरात ही तिन्ही मुलं आढळून आली. ही मुलं सापडल्याने पोलिसांसह कुटुंबियांच्या देखील जिवात जीव आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com