Indian Coast Gurad Recruitment Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; इंडियन कोस्ट गार्डमध्ये भरती सुरु; अशा पद्धतीने करा अर्ज

Indian Coast Gurad Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन कोस्ट गार्डमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

Government Job Vacancy: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कोस्ट गार्डमध्ये सध्या भरती सुरु आहे. कोस्ट गार्डमध्ये फ्रेशर्ससाठी नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. इंडियन कोस्ट गार्डमधील या नोकरीसाठी भरतीप्रक्रिया सुरु झाली आहे.

इंडियन कोस्ट गार्डमध्ये चार्जमॅन, एमटीएस, ड्राॉट्समॅन पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सुरुवात १ नोव्हेंबरपासून झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२४ आहे.

इंडियन कोस्ट गार्डमधील या नोकरीसाठी तुम्हाला indiancoastgurad.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.ग्रुप बी आणि ग्रुप सी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इंडियन कोस्ट गार्ड हे राज्याच्या सुरक्षा मंत्रालयाअंतर्गत काम करते.

इंडियन कोस्ट गार्डमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर / प्रोडक्शन इंजिनियरमध्ये डिप्लोमा केलेला असावा. ड्राफ्टसमॅन पदासाठी इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / मरीन इंजिनियरिंग / नेवल आर्किटेक्चर / शिप कन्स्ट्रक्टरमध्ये डिप्लोमा केलेला असावा. याचसोबत एमटीएस पीयून पदासाठी १०वी पास उमेदवार अर्ज करु शकतात.

या नोकरीबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. चार्जमॅन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय ३० वर्ष असायला हवे. ड्रॉट्समॅन पदासाठी १८ ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२४ आहे. (Indian Cost Guard Recruitment)

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परिक्षेद्वारे केली जाणार आहे. यामध्ये गणित, सामान्य ज्ञान, इंग्लिश, रिजनिंग यासंबंधित प्रश्न विचारले जाणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांना डायरेक्टोरेट ऑफ रिक्रूटमेंट, कोस्ट गार्ड हेडक्वार्टर, कोस्ट गार्ड अॅडमिनिस्ट्रेटिव्ह कॉम्प्लेक्स, सी १, फेज २, इंडस्ट्रीयल एरिया, सेक्टर ६२, नोएडा येथे पाठवायचा आहे. (Government Job)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nevasa Exit Poll: मानखुर्द मतदारसंघात कोण विजयी होणार? संभाव्य आमदाराचं नाव आलं समोर

Exit Poll Maharashtra : राहुरी विधानसभा मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : सिंदखेड राजामध्ये राजेंद्र शिंगणेंची जादू पुन्हा चालणार का? एक्झिट पोल काय सांगतो?

Maharashtra Exit Poll: श्रीवर्धनचा गड आदिती तटकरे राखणार? VIDEO

Sambhajinagar News : संभाजीनगरात एमआयएम व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT