दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. एसएससी आणि पोस्ट ऑफिसमध्ये अनेक जागांसाठी भरती करण्यात येत आहे. १० वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन, पोस्ट ऑफिसमध्ये जवळपास ५० हजारांहून अधिक जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. पोस्ट ऑफिसने जीडीएस पोस्टसाठी ३५००० अर्ज मागवले आहेत. तर स्टाफ सिलेक्शन कमिशनने ८,३२६ पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांनी मान्यताप्राप्त शाळेतून १० वी पास असणे आवश्यक आहे. त्यांना संगणकाचे ज्ञान आणि सायकल चालवण्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. नोकरीसाठी उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्ष असावे. पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२४ आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही indianpostgdconline.gov.in वर क्लिक करा.
कर्मचारी निवड आयोगाने ८,३२६ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी उमेदवाराचे वय १८ ते २७ असणे गरजेचे आहे. उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर त्यांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. या नोकरीसाठी १८ हजार ते २२ हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.