Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, पण कुठे? वाचा सविस्तर

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ झारखंडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ झारखंडमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. १०वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांवर ही भरती करण्यात येणार आहे.

सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ झारखंडच्या cuj.ac.in या वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. याच वेबसाइटवरुन तुम्ही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ ऑक्टोबर २०२४ आहे.

सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ झारखंडमध्ये सेक्शन ऑफिसर, प्रायव्हेट सेक्रेटरी या पदासाठी भरती निघाली आहे. त्याचसोबत असिस्टंट, ज्युनियर इलेक्ट्रिकल इंजिनियक, हिंदी ट्रान्सलेटर, सिनियर टेक्निकल असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, सिक्युरिटी ऑफिसर, डिविजनल क्लर्क लायब्ररी असिस्टंट पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. लोवर डिविजन क्लर्क, ड्रायव्हर, लॅबोरेटरीज अटेंडंट, लायब्ररी अटेंडंट पदासाठीदेखील भरती केली जाणार आहे. एकूण ३३ पदांवर ही भरती केली जाणार आहे.

सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ झारखंडमध्ये काही पदांसाठी १०वी, १२वी पास असणे गरजेचे आहे. तर त्याचसोबत काही पदांसाठी संबंधित क्षेत्रात ग्रॅज्युएट/ पोस्ट ग्रॅज्युएट पदवी प्राप्त असावी.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ३५ वर्ष असावी.

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला १००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे.नोकरीसाठी निवड करताना पहिली ऑबजेक्टिव टाइप टेस्ट द्यावी लागणार आहे. त्यानंतर डिस्क्रिप्टिव टाइप टेस्ट द्यावी लागणार आहे. यानंतर स्कील टेस्ट घेण्यात येईल. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड केली जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : देवी लक्ष्मीची कृपा होणार, उपासना फळाला येणार; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : लग्नाची बोलणी ते आर्थिक लाभ; तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा

Iran Israel War: इराणचा इस्त्राईलवर मिसाईल हल्ला, भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?

Devendra Bhuyar News : दादांचा आमदार बरळला; भरसभेत ठरवली मुलींच्या सौंदर्याची कॅटेगरी, पाहा व्हिडिओ

Pune Helicopter Crash : तटकरेंना घेण्यासाठी जाताना दुर्घटना; हेलिकॉप्टर अपघातात 2 कॅप्टनसह एका इंजिनिअरचा मृत्यू, VIDEO

SCROLL FOR NEXT