SBI Jobs
SBI JobsSaam Tv

SBI Jobs: महिन्याला ८५ हजार पगार अन् स्टेट बँकेत नोकरी, पण नेमकी पात्रता काय? कसा कराल अर्ज?

SBI Recruitment For Specialist Officer: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सध्या स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १५११ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
Published on

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. १,५११ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सध्या अजून एक भरती सुरु आहे. असिस्टंट मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. (SBI Jobs)

SBI Jobs
NABARD Job: दहावी पास तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महिना ३५००० पगार; असा करा अर्ज

स्टेट बँकेच्या असिस्टंट मॅनेजर (सिस्टीम्स) (JMGS) पदासाठी ७९७ जागा रिक्त आहेत. त्यातील काही जागा या राखीव प्रवर्गासाठ आरक्षित आहेत. या नोकरीसाठी B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर सायन्स अँड / सॉफ्टवेअर इंजिनियरिंग / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग) पदवीप्राप्त उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी ४८,४८० ते ८५,९२० रुपये पगार मिळणार आहे. मुंबई आणि नवी मुंबई येथील ऑफिसमध्ये ही भरती केली जाणार आहे. २१ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०२४ आहे. (State Bank Of India Recruitment)

SBI Jobs
Job At Google: गूगलमध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी; मिळणार लाखोंचे वेतन; अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या

या नोकरीसाठी ऑनलाइन परिक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी नगर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, पुणे, पणजी येथे परीक्षा केंद्र असणार आहे. या नोकरीसाठी उमेदवाराने https://bank.sbi/web/career/Current-Openings या वेबसाइटवर जाऊन नाव रजिस्टर करावे. या नोकरीसाठी अर्ज भरताना ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

SBI Jobs
ISRO Jobs: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; महिना २ लाख पगार; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com