Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या पैशांवर भावाचा डल्ला, तब्बल ३८ अर्ज भरले; सरकारला घरबसल्या चुना

Ladki Bahin Yojana Scam: अनेक व्यक्तींनी लाडकी बहीण योजनेत घोटाळा करत पैसे उकळले आहेत. आता देखील एका व्यक्तीने विविध नावांनी ३८ अर्ज भरून या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समजली आहे.
Ladki Bahin Yojana Scam
Ladki Bahin Yojana Saam TV
Published On

गणेश कवडे, मुंबई

Government Scheme Scam Update in Marathi: माझी लाडकी बहीण योजना विविध कारणांनी सतत चर्चेत आहे. या योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज केला आहे. काही व्यक्तींकडून यामध्ये घोटाळे देखील केले जात आहेत. यामुळे योजनांचा लाभ खऱ्या गरीब आणि गरजू महिलांना मिळत नाहीये. अनेक महिला या योजनेपासून वंचित राहिल्या आहेत.

Ladki Bahin Yojana Scam
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार? संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

लाडकी बहीण योजनेत होणाऱ्या घोटाळ्यांबाबत अशीच आणखी एक घटना उघडकीस आलीये. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एका व्यक्तीने ३८ अर्ज भरलेत. ⁠वेगवेगळ्या नावाने हे अर्ज भरले गेलेत आणि पैसे देखील काढण्यात आले आहेत. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पुढे सांगितले की, संबंधित बँकांना आदेश देऊन पैसे परत मिळवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ते अकाऊंट देखील सिल करण्यात येणार आहेत. ⁠त्या खात्यांशी कोणतेही शासकीय व्यवहार केले जाणार नाहीत. ⁠१५-२० दिवसांत सर्व व्हेरीफिकेशन केले जाणार आहे.

या प्रकरणी चौकशीत ज्या नागरिकांचे आधारकार्ड त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. प्राथमिक चौकशीत असं समजलं आहे की, ते अकाऊंट महिलांचे नाहीयेत त्यामुळे याबाबत अधिक तपास सुरू आहे, असंही आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितलं आहे.

रविवारपासून महिलांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे वितरीत केले जात आहेत. मात्र यातही काही महिलांना पैसे आलेत तर काहींना अद्याप पैसे मिळाले नाहीत. यावर आदिती तटकरे यांनी पुढे म्हटलं की, पहिल्या दोन महिन्यात अर्ज केले होते त्यांना २५ तारखेपासून पैसे दिले जात आहेत.

Ladki Bahin Yojana Scam
Ladki bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना खूशखबर... अर्ज करण्याची मुदत आणखी वाढणार, आतापर्यंत किती महिलांना मिळाला लाभ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com