Champai Soren : विधानसभा निवडणुकीपूर्वी झारखंड मुक्ती मोर्चाला मोठा धक्का ; चंपाई सोरेन यांची बंडखोरी

Champai Soren News/jharkhand Politics : झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून पक्षाबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ते दिल्लीत असून भाजपनमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.
Champai Soren
Champai SorenSaam Digital
Published On

झारखंडच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहे. जामीनावर सुटका झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी पुन्हा मुख्यंमत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे नाराज चंपाई सोरेन भाजपमध्ये जाण्याच्या चर्चां सुरू असताना त्यांनी आज सोशल मीडियावर पोस्ट टाकून पक्षाबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. मी मुख्यमंत्री असताना चांगले काम करत होतो, तरीही माझ्याकडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मागीतला गेला, त्यामुळे इथून पुढे माझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होईल, असं म्हटलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांपूर्वी झारखंड मुक्ती मोर्चासाठी (JMM) हा मोठा धक्का मानला जात आहे.

Champai Soren
Nashik Accident : कसारा घाटात भीषण अपघात; वाहन थेट खोल दरीत कोसळलं, ५ जणांचा मृत्यू | VIDEO

विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो, मात्र मला बैठकीचा अजेंडाही सांगण्यात आला नाही. त्यानंतर झालेल्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत राजीनामा मागीतला. अचानक राजीनामा मागीतल्याचं आश्चर्य वाटलं. पण मला सत्तेचा लोभ नाही, त्यामुळे ताबडतोब राजीनामा दिला. पण या प्रकारामुळे माझ्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली आहे.

तीन दिवसांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे मी भावुक होतो, अश्रू आवरण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्यांना केवळ खुर्चीची चिंता होती. ज्या पक्षासाठी आपण आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, त्या पक्षात माझं अस्तित्वच राहिलं नव्हतं. अशा अनेक अपमानास्पद घटना घडल्या ज्यांचा उल्लेख यावेळी करू इच्छित नाही. इतका अपमान आणि अवहेलना केल्यानंतर मला पर्यायी मार्ग शोधणे भाग पडलं, अशी खंत सोरेन यांनी बोलून दाखवली आहे.

Champai Soren
Nashik Accident : कसारा घाटात भीषण अपघात; वाहन थेट खोल दरीत कोसळलं, ५ जणांचा मृत्यू | VIDEO

आजपासून माझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होणार या प्रवासात माझ्याकडे तीन पर्याय आहेत. 'पहिला राजकारणातून संन्यास घेणे, दुसरा स्वतःची नवी संघटना उभी करणे किंवा तिसरा या वाटेवर कुणी साथी सापडला तर त्याच्यासोबत पुढचा प्रवास सुरू करणे. आज दुपारी चंपाई सोरेन दिल्लीत आले आहेत आणि त्यांच्या या पोस्टमुळे लवकरच ते भाजपमधे प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

Champai Soren
Supreme Court : मृतदेहांची अदलाबदली, कर्नलच्या कुटुंबीयांना दिला दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह; कोर्टाने रुग्णालयाला ठोठावला २५ लाखांचा दंड

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com