Metro Job Saam Tv
naukri-job-news

Metro Job: दिल्ली मेट्रोत नोकरीची संधी; महिना ९६००० रुपये पगार; पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

Delhi Metro Recruitment 2024: दिल्ली मेट्रोत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. दिल्ली मेट्रोत सध्या मॅनेजर पदासाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. दिल्ली मेट्रोत सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. दिल्ली मेट्रोत सध्या मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

दिल्ली मेट्रोत तुम्हाला मॅनेजर होण्याची चांगली संधी आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. तुम्ही दिल्ली मेट्रोच्या अधिकृत वेबसाइट delhimetrorail.com वर जाऊन अर्ज करु शकतात. (Delhi Metro Job)

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ नोव्हेंबर २०२४ आहे. मुदतीपूर्वी या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई (इलेक्ट्रिकल/मॅकेनिकल) मध्ये डिग्री प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी कमाल वयोमर्यादा ६२ वर्ष निश्चित करण्यात आली आहे.

दिल्ली मेट्रोतील या नोकरीसाठी मॅनेजर पदासाठी ९६,६०० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. तर असिस्टंट मॅनेजर पदासाठी ७५,१००० रुपये वेतन मिळणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. उमेदवारांची बुद्धिमत्ता, स्किल, फिजिकल फिटनेस या सर्व गोष्टींच्या आधारे निवड केली जाणार आहे. (Delhi Metro Recruitment)

या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज अधिकृत वेबसाइटवरुन डाउनलोड करावा लागणार आहे. त्यानंतर त्याला स्पीड पोस्ट किंवा ईमेलद्वारे पाठवावा लागणार आहे. एचआर, दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन, फायर ब्रिगेड लेन, बाराखंभा रोड, नवी दिल्ली येथे तुम्हाला अर्ज पाठवावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Chikoo Benefits: डायबिटीज असलेली व्यक्ती चिकू खाऊ शकते का? जाणून घ्या

Cyclone Arnab: चक्रीवादळ अर्नब येणार? 3 राज्यांत वर्षातील पहिल्या वादळाचा धोका, मुसळधार पावसाचा अलर्ट!

Knee Pain: मांडी घालून बसल्यावर उठताना नेहमी गुडघे दुखतात? दुर्लक्ष करू नका, असू शकते ‘या’ आजारांचे लक्षण

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

SCROLL FOR NEXT