Maharashtra News Live Update: Mumbai: सांगली जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत ९४ टक्के मतदानाची नोंद.

Marathi Breaking Live Headlines Updates: इंडिया आघाडीचा दिल्लीत मोर्चा, रामलीला मैदान, ज्ञानेश कुमार, निवडणूक आयोग, नाशिक महाकुंभमेळा, महायुतीत ठिणगी, हवामानाचे अपडेट, अर्णब चक्रीवादळाचे अपडेट, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News
Published On: 

सांगली जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत ९४ टक्के मतदानाची नोंद

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत सहा जागांसाठी अत्यंत चुरशीने मतदान झाले आहे. ९४% मतदानाची नोंद झाली आहे.सहा जागांसाठी तेरा उमेदवार हे रिंगणात होते तर २ हजार ४४६ मतदार होते. जिल्ह्यामध्ये यासाठी १२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली,अत्यंत चुरशीने सोसायटी व अन्य गटांसाठी मतदान झाले आहे.जत मध्ये सोसायटी गटासाठी मतदानावेळी झालेला गोंधळ वगळता जिल्ह्यामध्ये शांततेत मतदान पार पडले आहे.जत सोसायटी गटासाठी आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध काँग्रेसचे विनोद पवार यांच्यात काट्याची लढत झाली आहे, तर तासगाव सोसायटी गटामध्ये खासदार संजयकाका पाटील आणि माजी आमदार सुमनताई पाटील यांच्यात चुरस पाहायला मिळाली आहे.या सर्वच उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झाला असून ३ नोव्हेंबर रोजी मतदानाची मतमोजणी पार पडणार आहे.

लग्नाच्या कारणावरून तरुणाचा मोबाईल टॉवरवर चढून हायव्होल्टेज ड्रामा

लग्नाच्या कारणावरून तरुणाचा मोबाईल टॉवरवर चढून हायव्होल्टेज ड्रामा मामुर्डी येथील गोदरेज स्कीमजवळ गहुंजे रोडवर सायंकाळी चार वाजल्यापासून एक तरुण उंच मोबाईल टॉवरवर चढून बसला होता. लग्नाच्या कारणावरून हा तरुण टॉवरवर चढल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन दल आणि पीएमआरडीएच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. ब्रांटो वाहनाच्या मदतीने तब्बल साडेतीन तासांच्या प्रयत्नांनंतर या तरुणाला सुखरूप खाली उतरवण्यात जवानांना यश आलं. मात्र लग्न होत नाही म्हणून सैरभैर झालेल्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलत शोले स्टाईल ने मोबाईल टॉवर वर चढून प्रशासनाची चांगलीच धांदल उडवली होती...

नरभक्षक बिबट्याचा महिलेवर हल्ला; हल्ल्यात महिलेचा बळी

पालघर जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच असून, आज पुन्हा एका महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. वाणगावजवळील चंडीगाव येथे बागेत काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला करत तिचा बळी घेतला. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी वेहूर येथेही एका महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पालघर, चिंचणी, वाणगाव आणि डहाणू परिसरात बिबट्यांचा वाढता वावर चिंतेचा विषय बनला असून, वनविभागाने तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कांदिवलीत ऑइलमुळे १४ दुचाकींचे अपघात; अनेक जण जखमी!

* कांदिवली पूर्व परिसरात एकाच ठिकाणी तब्बल १४ दुचाकींचे अपघात.

* उत्तर प्रादेशिक पोलीस कार्यालयासमोरील रस्त्यावर अपघातांची मालिका.

* रस्त्यावर ऑइल सांडल्याने दुचाकी घसरून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती.

* एकापाठोपाठ एक दुचाकी घसरल्याने वाहनचालकांचा गोंधळ.

* या अपघातांमध्ये अनेक दुचाकीस्वार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती.

* रस्त्यावर ऑइल सांडल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

* अपघातानंतर संबंधित रस्त्यावरील ऑइल हटवून सुरक्षितता उपाययोजना करण्याची गरज.

* १४ दुचाकी घसरल्या; प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची गरज!

परळीत ज्ञानेश कुमारांच्या विरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन

दिल्ली येथे इंडिया आघाडीच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनाला परळी महाविकास आघाडीने जाहीर पाठिंबा दर्शविला. यावेळी परळीत महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत SIR प्रक्रियेच्या विरोधात तसेच ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंदणी करा; गडचिरोलीत भव्य ओबीसी मोर्चा

गडचिरोलीत आज ओबीसी समाजाने शक्तीप्रदर्शन केले. जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंदणी करावी आणि ओबीसींची योग्य वर्गवारी करावी या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा भव्य मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आणि जोरदार एल्गार केला.गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर आज सकाळपासूनच ओबीसी बांधवांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. ओबीसी नेते, कार्यकर्ते आणि हजारो सामान्य नागरिक हातात फलक आणि झेंडे घेऊन या मोर्चात सहभागी झाले होते.

उद्घाटनापूर्वीच मान मेट्रो स्टेशन मध्ये पावसाच्या पाण्याची गळती

येत्या तीन नोव्हेंबरला बहुप्रतिक्षित शिवाजीनगर हिंजवडी मान मेट्रोचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मात्र लोकार्पणापूर्वीच मेट्रो स्टेशन मध्ये पावसाचे पाणी गळू लागल्याने मेट्रोच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरात विविध विकासकामांचे लोकार्पण

विभागीय क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल मैदान, फ्लड लाईट्स व युवा वसतिगृहाचे लोकार्पण झाले.

हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाचा जोरदार तडाखा; रस्ते जलमय, नागरिकांची तारांबळ 

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात आज संध्याकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचून रस्ते जलमय झाले. संध्याकाळपासून पिंपरी-चिंचवड शहरात ढगाळ वातावरण होते, त्यानंतर काही भागांत अवकाळी पावसाने जोर धरला. अचानक आलेल्या पावसामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांची आणि वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली.

खामगावजवळ भीषण अपघात! ट्रक-काळची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू; कारमध्ये 27 किलो गांजा सापडला

मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वर खामगावजवळ ट्रक आणि कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील सतीश सखाराम जाधव (परभणी) आणि सय्यद फिरोज सय्यद मेहमूद या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यामध्ये 14 लाख रुपये किमतीचा 27 किलो गांजा आढळून आला.

कल्याण-डोंबिवलीवर पाणीटंचाईचं संकट! उल्हास नदीची पातळी घटली, नागरिकांना पाणीपुरवठ्याची चिंता

कल्याण-डोंबिवली शहरावर पाणीटंचाईचं संकट घोंगावू लागलं आहे. उल्हास नदीची पाणीपातळी घटल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातच एमआयडीसीकडूनही शहराला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी सोमवारी महापालिका आयुक्तांची एमआयडीसी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे.

मतचोरीच्या आरोपावरून मुंबईत विरोधक आक्रमक! CSMT बाहेर आंदोलन

दिल्लीतील मतचोरीच्या आरोपांवरून सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद मुंबईतही उमटले असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर विरोधी पक्षांनी आंदोलन केले. या आंदोलनात समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्यासह ठाकरे गटाची शिवसेना, काँग्रेस आणि माकपचे कार्यकर्ते सहभागी झाले.

रावेरच्या चार भावंडांच्या हत्येचा तपास; IPS कुमार चिंता यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार भावंडांच्या सामूहिक हत्येचा यशस्वी तपास केल्याबद्दल यवतमाळचे पोलीस अधीक्षक IPS कुमार चिंता यांची केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकासाठी निवड झाली आहे.

आम्ही लोकशाही संपू देणार नाही -  रामलीला मैदानावरून राहूल गांधी 

रामलीला मैदानावरून राहुल गांधी यांनी लोकशाहीच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडल्याचा दावा केला जात आहे. "आम्ही लोकशाही संपू देणार नाही," या वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे.

शाहूनगरच्या सुंदरम सोसायटीत नेमकं काय घडलं? घटना CCTV मध्ये कैद

पिंपरी चिंचवड शहरातील शाहू नगर येथील सुंदरम सोसायटीमध्ये 29 ऑक्टोबरला घरफोडीची घाटना घडली आहे. सुंदरम सोसायटी या ठिकाणी पाहाटे पाच वाजता चेहऱ्यावर कपडा बांधून आणि हातात धारदार शस्त्र घेऊन आलेल्या दोन चोरट्यांनी सोसायटीतील दोन सदनिकां मध्ये घरपोडी केली आहे. तुरटी खरपुड करत असतानाची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे . मध्यवस्ती असलेल्या सोसायटीमध्ये चोरटे चेहऱ्यावर कापड बांधून आणि हातात शस्त्र घेऊन घरफोडी करत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे.

कोल्हापुरात अश्वक्रीडेदरम्यान अपघात

गोकुळ शिरगाव येथील दक्षिण व्हॅलीमध्ये सुरू असलेल्या अश्वक्रीडा स्पर्धेदरम्यान अपघाताची घटना घडली आहे. अश्वक्रीडेचे प्रदर्शन सुरू असताना एका घोडेस्वाराचा तोल जाऊन तो थेट जमिनीवर कोसळला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दक्षिण व्हॅलीमध्ये शो जंपिंग, ड्रेसाज आणि टेंट पेगिंग अशा विविध अश्वक्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले आहे. या अपघातामुळे काही क्षणांसाठी उपस्थित प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली.

क्रांती येत आहे, आम्ही सत्ताबदलाच्या दिशेने जात आहोत - संजय राऊत

दिल्लीतील रामलीला मैदानावर INDIA आघाडीच्या भव्य रॅलीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत सहभागी झाले. यावेळी त्यांनी सत्ताबदलाचे संकेत देणारे वक्तव्य केले. “क्रांती येत आहे. आम्ही सत्ताबदलाच्या दिशेने जात आहोत,” असं राऊत म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) विरोधात ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

पाणी गळती विरोधात पुण्यात अनोख आंदोलन

पाणी गळती विरोधात पुण्यात अनोख आंदोलन

पाईपलाईन मधून ज्या ठिकाणी पाणी गळती होत आहे तिथेच आंघोळ करत स्थानिकांना केलं आंदोलन

पुण्यातील विश्रांतवाडी भागातील प्रकार

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरूआहे

पुणे महानगरपालिकेचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिकांकडून जिथे पाणी गळती होत आहे तिथेच आंघोळ करत प्रशासनाचा निषेध

रस्त्यावर शाम्पू ,साबण लावत जिथून पाणी गळती होत आहे त्याच पाण्याने करण्यात आली अंघोळ

दुबई आणि मुंबई येथील भाविकांकडून दोन सुवर्ण स्वतिके साईबाबांच्या चरणी अर्पण

दुबई येथील एका साईभक्ताने 80 ग्रॅम वजनाचे आकर्षक नक्षीकाम असलेले सुवर्ण स्वस्तिक साईबाबांच्या चरणी अर्पण केले आहे.. तर मुंबई येथील एका साईभक्ताने 80 ग्रॅम वजनाचे सुंदर नक्षीकाम केलेले आणखी एक सुवर्ण स्वस्तिक साईचरणी अर्पण केले आहे.. या दोन्ही सुवर्ण स्वस्तिकांची एकत्रित किंमत 20 लाख 61 हजार रुपये इतकी आहे.. ही दोन्ही सुवर्ण स्वस्तिके साईबाबांच्या मूर्तीशेजारील मागील भिंतीवर बसविण्यात आली आहेत.. देणगीदार साईभक्तांच्या विनंतीनुसार त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत

माढा तालुक्यातील उपळवटे गावात फायनान्स वसुलीदारांना प्रवेशबंदी

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि महिला आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा कठीण परिस्थितीत फायनान्स व मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या वसुली प्रतिनिधींकडून कर्जवसुलीसाठी नागरिकांवर दबाव टाकणे, घरोघरी जाऊन तगादा लावणे आणि मानसिक त्रास देण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा ठाम पवित्रा जनशक्ती शेतकरी संघटनेने घेतला आहे.

याच पार्श्वभूमीवर माढा तालुक्यातील उपळवटे गावात फायनान्स व मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या वसुलीदारांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. दुष्काळामुळे आधीच शेतकरी आणि सामान्य नागरिक आर्थिक संकटाचा सामना करत असताना कर्जाच्या वसुलीसाठी होणारा तगादा अन्यायकारक असल्याची भूमिका संघटनेने मांडली आहे.

शरद पवार दुष्काळी अरण गावाला आज भेट देणार

माढा तालुक्यातील दुष्काळी अरण येथील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार येणार आहेत.

तुळशी येथील शेतीला माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळावे या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी आरण हे गाव विक्री स काढले होते त्यामुळे संपूर्ण राज्यभरात या गावाची चर्चा झाली होती यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी व सामाजिक संस्थांनी येथे येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला होता.

INDIA आघाडीच्या नेत्यांचा रामलीला मैदानाकडे मोर्चा

दिल्लीमध्ये INDIA आघाडीच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (SIR) विरोध करण्यासाठी भव्य रॅली आयोजित केली आहे. या रॅलीसाठी आघाडीचे नेते रामलीला मैदानाच्या दिशेने रवाना झाले आहेत. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदार यादीच्या पुनरीक्षणावरून हा विरोध केला जात आहे. या आंदोलनाकडे देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सातपुड्यातील सर्वात उंच शिखरावर होणाऱ्या अस्तंबा यात्रेसाठी प्रशासन सज्ज

सातपुड्यातील सर्वात उंच शिखरावर होणाऱ्या अस्तंबा यात्रेसाठी प्रशासन सज्ज..

5 ते 8 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या यात्रेवर राहणार ड्रोन कॅमेऱ्याची करडी नजर. ..

भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आणि स्वयंसेवकांची होणार नियुक्ती....

पर्यावरणाच्या रक्षणार्थ यात्रेत फटाके न फोडण्याचे आवाहन...

'सकाळ मॅरेथॉन'च्या दुसऱ्या पर्वात धावले हजारो सोलापूरकर

निरोगी सोलापूरच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी सकाळ माध्यम समूहाकडून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत आज हजारो सोलापूरकरांनी सहभाग नोंदवला.सोलापूर सकाळ मॅरेथॉनचे हे दुसरे पर्व आहे.या दोन वर्षात सोलापुरातील सर्वच धावपटुंना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम 'सकाळ' करत आहे. सोलापुरातील होम मैदानापासून ते निर्मिती लॉन्स पर्यंत हा धावण्याचा मार्ग असल्याने पहाटे 5 पासून सोलापूरकर या मार्गावर धावताना दिसून आले.जवळपास 10 किमी धावपट्टू आज या मॅरेथॉनमध्ये धावले आहेत.

सावंतवाडी शहरात भरवस्तीत रान गव्यांचा कळप आला रस्त्यावर

सावंतवाडी शहरातील साईलवाडा परीसरात भरवस्तीत रान गव्यांचा कळप रस्त्यावर आला.

रात्रीच्या वेळी भरवस्तीत गव्या रेड्यांचा कळप दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

पुण्यात रामराज कॉटन शोरूमचे उद्घाटन

पुण्यात रामराज कॉटन शोरूमचे उद्घाटन

दक्षिण भारताबाहेर राष्ट्रीय विस्ताराला सुरुवात

रश्मी ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल

रश्मी ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल...

राज ठाकरे यांच्या घरगुती कार्यक्रमासाठी रश्मी ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी आल्याची माहिती...

तर उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात पोहचले आहेत

रायगडच्या पोलादपुरमध्ये घराला आग

रायगडच्या पोलादपुरमध्ये घराला आग

अगीत घरातील सामानासह संपूर्ण घर जळून खाक

पोलादपुर तालुक्यातील बोरज येथील घटना

आगीच कारण समजू शकल नाही

स्थानिक ग्रामस्थांनी आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले

अखेर राणा सूर्यवंशीची वाय प्लस सुरक्षा हटवली!

अखेर राणा सूर्यवंशीची वाय प्लस सुरक्षा हटवली!

हल्ल्याच्या १३ दिवसांनंतरही गूढ कायम

हल्ल्याचा तपास अपूर्ण असतानाच सुरक्षा व्यवस्थेत मोठा बदल

नंदुरबारच्या प्रसिद्ध मिरची उद्योगावर दुष्काळाचे सावट

नंदुरबारच्या प्रसिद्ध मिरची उद्योगावर दुष्काळाचे सावट

7 हजार हेक्टरवरील मिरची पिकाला फटका

सामान्यांच्या खिशाला बसणार झळ

औसा तालुक्यातील बेलकुंड येथे साबण निर्मिती करणाऱ्या कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेलकुंड येथे साबण बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही, मात्र आगीची तीव्रता, जास्त असल्याने यामध्ये मोठ प्रमाणात नुकसान झाले आहे.

बेळगावातील काळा दिन रॅलीत सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना पोलिसांनी अडवलं

बेळगावातील काळा दिन रॅलीत सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना पोलिसांनी अडवलं

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काही काळ तणाव

जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचा वतीने आज ५११ लाभार्थ्यांना ५१ करोड रुपयांचे कर्ज वितरण

जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचा वतीने आज ५११ लाभार्थ्यांना ५१ करोड रुपयांचे कर्ज वितरण करण्यात येत आहे.

घाटकोपर मध्ये पार पडत असलेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा पवार, अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित राहणार आहेत.

Pune:  राणा सूर्यवंशी यांना मोठा झटका, Y+ सुरक्षा हटवली

पुणे - राणा सूर्यवंशी यांना मोठा झटका

राणा सूर्यवंशी यांची Y+ सुरक्षा गृह विभागाकडून हटवली

Thane: राम पुर्णेकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

प्रदीप पूर्णेकर हत्याकांड प्रकरण

राम पुर्णेकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

वडील प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी भेट घेतली

Thane: प्रदीप पूर्णेकर हत्ये प्रकरणी आगरी समाज आक्रमक,  जनआंदोलन उभारण्याचा दिला इशारा

प्रदीप पूर्णेकर हत्ये प्रकरणी आगरी समाज आक्रमक

राजेंद्र शिंदे यांना अटक न झाल्यास मोठं जनआंदोलन उभारण्याचा इशारा.

Delhi: गोकुळ विजयानंतर सतेज पाटील यांना हर्षवर्धन सपकाळ यांनी उचलून घेत केलं अभिनंदन

गोकुळ विजयानंतर सतेज पाटील यांना हर्षवर्धन सपकाळ यांनी उचलून घेत केलं अभिनंदन

दिल्लीत हर्षवर्धन सपकाळ यांनी सतेज पाटील यांना घेतले उचलून

दिल्लीत गोकुळ चा विजय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला साजरा

Sangli: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक मतदान, जत मधील मतदान केंद्रावर गोंधळ

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक मतदान

जतमधील मतदान केंद्रावर गोंधळ

मतदान झाल्यावर मत दाखवण्यात येत असल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्यांचा आक्षेप

गुप्त मतदानाचा भंग होत असल्याचा आरोप.

माजी आमदार विक्रम सावंत आणि माजी सभापती सुजय शिंदे यांनी घेतला आक्षेप

Nandurbar: नंदुरबारचा सातपुडा परिसर बनतोय गांजाचा हब

नंदुरबारचा सातपुडा परिसर बनतोय गांजाचा हब

आतापर्यंत तब्बल 9 कोटी 40 लाखांचा गांजा जप्त

वनपट्ट्यात गांजा लागवडीचे प्रशिक्षण देतंय कोण

आंतरराष्ट्रीय तस्कर टोळीचा हात असल्याचा संशय

वर्षभरात 56 गुन्हे दाखल, पण गांजा तस्करीचे मुख्य सूत्रधार अद्याप मोकाटच

Solapur: शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळाला न्याय, गोकुळ शुगर कारखान्याच्या थकीत उसाचे बिल वाटप सुरु

लातूर - अखेर शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळाला न्याय, गोकुळ शुगर कारखान्याच्या थकीत उसाचे बिल वाटप सुरु

- गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गोकुळ शुगर कारखान्याच्या शेतकऱ्यांचे ऊस बिल होते थकीत

- शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर आ. सचिन कल्याणशेट्टी आणि तहसीलदार किरण जमदाडे यांनी मध्यस्थी करत ऊस बिल मिळवून देण्याचे दिले होते आश्वासन

- अखेर थकीत ऊस बिल धारकांना धनादेशाचे वाटप सुरू

- शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी लाभ मिळावा यासाठी रविवारच्या दिवशी देखील शासकीय कार्यालय सुरू ठेवून करण्यात आले वाटप

Delhi: इंडिया आघाडीच्या रामलीला मैदानावरील रॅलीला भाजपचे प्रत्युत्तर

दिल्ली - इंडिया आघाडीच्या रामलीला मैदानावरील रॅलीला भाजपचे प्रत्युत्तर

शीख समाजाच्या सन्मानार्थ भाजप काढणार मोर्चा

हरि नगर बस डेपो ते टिळक नगर मेट्रो स्टेशन पर्यंत काढणार मोर्चा

इंदिरा गांधी आणि राहुल गांधी यांचा निषेध नोंदवला जात आहे

1984 मधील शीख दंगली ला कॉंग्रेस जबाबदार असल्याचा भाजपचा आरोप

Pune: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते १५ नोव्हेंबरला 'पुणे रन फॉर युनिटी २०२६'चा फ्लॅग ऑफ

पुणे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते १५ नोव्हेंबरला 'पुणे रन फॉर युनिटी २०२६'चा फ्लॅग ऑफ

पुण्यात राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती राहणार

मॅरेथॉनमध्ये ४० हजारांहून अधिक नागरिक सहभागी होण्याचा आयोजकांचा दावा

केनियासह आफ्रिकन देशांतील आंतरराष्ट्रीय धावपटूंचाही सहभाग

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी आयोजन

Yavatmal: यवतमाळच्या अरूणावती प्रकल्पाच्या डाव्या कालव्याला भगदाड

यवतमाळ - अरूणावती प्रकल्पाच्या डाव्या कालव्याला भगदाड

दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी,दुष्काळात तेरावा महिना

डाव्या कालव्यातून होणारी पाण्याची नासाडीला जबाबदार कोण?

कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोण करणार कारवाई?

Sambhajingar: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगरात विविध विकासकामांचे लोकार्पण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगरात विविध विकासकामांचे लोकार्पण

विभागीय क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल मैदान, फ्लड लाईट्स व युवा वसतिगृहाचे लोकार्पण

३४ वातानुकूलित ई-बस, ई-व्ही चार्जिंग स्टेशन, सौरऊर्जा प्रकल्प व मिटमिटा शाळेच्या नवीन इमारतीचेही उद्घाटन

Delhi: ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी इंडिया आघाडी आक्रमक

ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी इंडिया आघाडी आक्रमक

रामलीला मैदानावर महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यासाठी रामलीला मैदानावर वर जय्यत तयारी करण्यात आली आहे.

मोठ्या प्रमाणावर खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत.

रामलीला मैदानावर दोन स्टेज तयार करण्यात आले आहेत.

Sangli: सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांसाठी आज पार पडणार मतदान

सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांसाठी आज पार पडणार मतदान

गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष..

जिल्ह्यामध्ये 12 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

आठ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

21 पैकी 15 जागा बिनविरोध झाले असून सहा जागांसाठी वेगवेगळ्या गटातून निवडणूक होत आहे, यामध्ये.

Yavatmal: यवतमाळ जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी बैठकांचा धुरळा

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाचा गड कोण सर करणार, याचा फैसला अद्याप झालेला नाही.

यामुळे बँकेच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकत शिंगेला पोहचली आहे.

उद्या अध्यक्ष व दोन उपाध्यक्षांची निवड होणार असल्याने आज महायुती आणि महाविकास आघाडीच्या स्वतंत्र बैठकांमध्ये राजकीय डावपेचांना धार चढणार आहे.

Dharashiv: उच्च शिक्षण आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधरांना 4000 रुपये महिन्याला आर्थिक मदत करा- आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील

धाराशिव -

उच्च शिक्षण आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधरांना 4000 रुपये महिन्याला आर्थिक मदत करा

पुढील 13 महिने शेतातून पैसे मिळणार नाहीत,मोठ्या शहरात मेस आणि राहण्यासाठी आर्थिक मदतीची गरज

नूतन पदवीधर आमदार डॉ. प्रतापसिंह पाटलांकडून विभागीय आयुक्तांना पत्र

Nagpur: काँग्रेसविरोधात भाजपची राज्यव्यापी मोर्चेबांधणी सुरू

नागपूर -

- ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानांतर्गत राष्ट्र चिंतन संवाद कार्यक्रम, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे, रॅली आणि नागरिकांशी संवादाचे कार्यक्रम

- 5 नोव्हेंबरला नागपुरातून राज्यव्यापी अभियानाची सुरुवात

- काँग्रेसविरोधात भाजपची राज्यव्यापी मोर्चेबांधणी सुरू आहे. ८० नेत्यांची फौज सज्ज

- पदवीधर निवडणुकीतील पराभवानंतर भाजपची तरुण मतदारांना पुन्हा जोडण्यासाठी रणनीती

- राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे, रॅली आणि नागरिकांशी संवादाचे कार्यक्रम

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे करणार नेतृत्व

Yavatmal: यवतमाळमध्ये दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार

यवतमाळमध्ये दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार

5 नोव्हेंबरला आंदोलन करणार आहेत

25 हजारांसह दिवाळी भेटीस थकबाकीची मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.