Manasvi Choudhary
दिवाळी या सणाला महिला खास पारंपारिक मराठमोळा लूक करतात. दिवाळीनिमित्त तुम्हीही साडी नेसण्याचा विचार करत असाल तर कॉटनच्या साड्या निवडा.
कॉटनच्या साड्यांचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स कोणते ते या वेबस्टोरीतून पाहूया.
चंदेरी कॉटन साड्यांमध्ये असणारी खास चमक आणि जरी काम अत्यंत उठून दिसते दिवाळीसाठी सणासुदीला तुम्ही ही साडी निवडू शकता.
प्लेन किंवा फिक्या रंगाच्या कॉटन साडीवर जरीची बॉर्डर असेल तर ती साडी सुंदर दिसते.
साडीवर असणाऱ्या जॉमेट्रिक प्रिंट तुम्ही निवडू शकता या साड्यांना पारंपारिक इतक कॉटन साड्या म्हणतात.
मऊ, सुटसुटीत मलमल कॉटन साड्या तुम्ही सणासुदीला निवडू शकता. या साड्या अत्यंत सुंदर दिसतात.
हँड ब्लॉक कॉटन साड्या सध्या खूप ट्रेडिंगमध्ये आहेत. ऑक्सिडाइज्ड दागिन्यांसोबत या साडीची स्टायलिंग खूपच सुंदर दिसते.