Manasvi Choudhary
दिवाळी सण म्हटलं की सर्वातआधी सुरू होते ती म्हणजे घराची साफसफाई.
हॉल, बेडरूम, आणि किचनच्या भिंतींसोबतच स्वयंपाकघरातील फ्रिज, मशीन, ओव्हन देखील स्वच्छ करायचे असते.
सणासुदीच्या काळात घरात विविध प्रकारची मिठाई, फराळ, दुधाचे पदार्थ आणि भाज्या साठवण्यासाठी फ्रिज स्वच्छ करणे महत्वाचे असते. अशावेळी फ्रिज स्वच्छ करायचा असेल तर तुम्ही सोप्या टिप्स लक्षात ठेवा.
फ्रिज स्वच्छ करण्यासाठी सर्वातआधी फ्रिज बंद करा. त्यानंतर फ्रिजमधील सर्व बाटल्या, भांडी, भाज्या आणि उरलेले अन्नपदार्थ बाहेर काढा. जे पदार्थ खराब झाले आहेत ते फेकून द्या.
फ्रिजमध्ये काचेचे शेल्फ्स, ड्रॉअर्स आणि डोअर रॅक बाहेर काढा. ते कोमट पाण्यात थोडे भांडी धुण्याचे लिक्विड टाकून मऊ स्पंजने धुवून घ्या.
एका स्प्रे बाटलीत कोमट पाणी घेऊन त्यात २ चमचे बेकिंग सोडा आणि २ चमचे पांढरा व्हिनेगर टाका. आतील भिंतींवर, कोपऱ्यांवर आणि डागांवर मारा.
अनेकदा फ्रिजच्या दरवाजाच्या रबरमध्ये धूळ, बुरशी आणि अन्नाचे कण अडकतात. जुन्या टूथब्रशवर थोडी व्हाईट टूथपेस्ट किंवा बेकिंग सोड्याची पेस्ट घेऊन हे रबर हळूवार घासा आणि ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या.
फ्रिज स्वच्छ केल्यानंतर त्यातील उग्र किंवा वाईट वास घालवण्यासाठी एका लहान वाटीत १ ते २ चमचे बेकिंग सोडा किंवा वापरलेली कॉफी पावडर ठेवून द्या. तसेच, लिंबाचा अर्धा कापलेला तुकडा फ्रिजच्या कोपऱ्यात ठेवल्यास आतील वातावरण नेहमी फ्रेश राहते.