CISF Bharti Saam Tv
naukri-job-news

CISF Bharti: CISF मध्ये १,१३० पदांसाठी भरती; पात्रता १२वी पास अन् पगार ६९,१००; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

CISF Constable Jobs 2024: CISF मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. कॉन्स्टेबल पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना भरघोस पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स म्हणजे CISF मध्ये नोकरी करण्याची संधी आहे. CISF मध्ये कॉन्स्टेबल/फायर (Male) पदासाठी १,१३० जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी तुम्ही अर्ज करु शकतात. महाराष्ट्र राज्यासाठी ७२ जागा रिक्त आहेत.

संपूर्ण देशभरात ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी १२ वी पास उमेदवारांनी अर्ज करावेत. १२वीत विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. तसेच त्यांनी तत्सम परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. या नोकरीसाठी १८ ते २३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. (CISF Jobs)

CISF मध्ये तुम्हाला पे स्केल ३ नुसार वेतन २१,७०० के ६९,१०० रुपये पगार मिळू शकतो. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शारीरिक क्षमता चाचणी (PET), शारीरिक मापदंड चाचणी (PST), कागदपत्र पडताळणी (DV), लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर वैद्यकीय चाचणी केली जाते.

या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांना रोल नंबर दिला जाईल. त्यानंतर परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी केले जाईल. शारीरिक क्षमता चाचणीसाठी उमेदवारांना धावण्याची टेस्ट द्यावी लागणार आहे. (CISF Recruitment)

या नोकरीसाठी उमेदवारांना १०० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. माजी सैनिक आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना फी माफ आहे. या नोकरीसाठी परिक्षेबाबत सर्व माहिती https://cisfrectt.cisf.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी परीक्षेच्या ठिकाणी उमेदवारांना आयडी प्रूफ, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो सोबत न्यावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील आघाडीवर

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT