Central Bank Jobs Saam tv
naukri-job-news

Central Bank Jobs: सेंट्रल बँकेत नोकरीची संधी; सुपरवायजर पदांसाठी भरती जाहीर; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

Central Bank Of India Jobs 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बीसी सुपरवायजर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सेंट्रल बँकेत नोकरीची संधी

सुपरवायजर पदांसाठी भरती जाहीर

रिटायर्ड कर्मचारीदेखील करु शकतात अर्ज

सरकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. सेंट्रल बँकेत बीसी सुपरवायजर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

सेंट्रल बँक ऑफ इंडियातील या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्हाला centralbank.bank.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सेंट्रल बँकेत नोकरीची संधी (Central Bank of India Recruitment)

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने कृषी, ग्रामीण विकास आणि वित्तीय समावेशन कार्यालयात भरती केली जाणार आहे. बिझनेस कॉरेस्पॉडेंट पदासाठी ही भरती केली जाणार आहे. रिटायर्ड आणि तरुण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

सेंट्रल बँकेने ३ जागांसाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२५ आहे. २१ ते ६४ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. १२ महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे.

पात्रता (Eligibility)

तरुण उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत कॉम्प्युटरचे ज्ञान असावे. एम.एससी, बीई (आयटी), एमसीए किंवा एमबीए डिग्री केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

रिटायर्ड कर्मचाऱ्यांसाठी पात्रता अशी आहे की त्यांनी कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत सीनियर मॅनेजर पदावरुन निवृत्त झालेले असावे. सेंट्रल बँकेतील सेवानिवृत्त क्लर्क उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६४ पेक्षा कमी असावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ZP निवडणुकीआधी लाडकीच्या खात्यात 1500 तर शेतकऱ्यांच्या खात्यात 4000?

School Holiday : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, २३ जानेवारीला शाळांना सुट्टी; जाणून घ्या कारण

सत्ता समीकरण बदलणार; भाजपची सत्तेसाठी ठाकरे गटाला 'ऑफर', पक्षप्रमुख काय निर्णय घेणार?

Maharashtra Live News Update: पुणे महापालिका महापौर पदासाठी उद्या आरक्षण सोडत

Pune Mayor: पुण्यात भाजप महापौरपदासाठी कुणाला संधी देणार? या १० नावांची चर्चा

SCROLL FOR NEXT