Bombay High Court Job Saam Tv
naukri-job-news

Bombay High Court Job: खुशखबर! मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी; २३८१ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Bombay High Court Recruitment 2025: मुंबई उच्च न्यायालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. २३८१ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

मुंबई उच्च न्यायालयात नोकरी करण्याची संधी

२३८१ पदांसाठी भरती जाहीर

विविध पदांसाठी होणार भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. मुंबई उच्च न्यायालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. मुंबई उच्च न्यायालयात क्लर्क, शिपाई, ड्रायव्हर स्टेनो लोअर आणि स्टेनो हायर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण २३८१ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १५ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जानेवारी २०२६ आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

मुंबई उच्च न्यायालयात २३८१ पदांसाठी भरती होणार आहे. क्लर्क पदासाठी १३८२ जागा रिक्त आहे.शिपाई पदासाठी ८८७ जागा रिक्त आहेत. ड्रायव्हर पदासाठी ३७ जागा रिक्त आहेत. स्टेनो लोअर पदासाठी ५६ जागा रिक्त आहेत तर स्टेनो हायर पदासाठी १९ जागा रिक्त आहेत.

क्लर्क आणि स्टेनोग्राफर पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत त्यांना टायपिंगचे ज्ञान असायला हवा. शिपाई पदासाठी उमेदवारांनी १०वी पास असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २८ यामध्ये असावी. याबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत दिली आहे.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्हाला bombayhighcourt.nic.in या वेबसाइटवर जावे लागेल.

यानंतर होमपेजवरील अप्वाय लिंकवर क्लिक करा.

यानंतर तुमची सर्व माहिती भरुन अर्ज भरा.

यानंतर फी भरुन अर्ज सबमिट करा. अर्जाची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: मुंबईत ठाकरेसेनेला मोठं खिंडार, बड्या महिला नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

Maharashtra Live News Update : अहिल्यानगर मनपा निवडणुकीत अजित पवार गटाच्या कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड...

Health Tips : सावधान! जेवणानंतरची एक चूक पडेल महागात,आताच सोडा 'ही' सवय

Rent Agreement: घरमालक-भाडेकरुंसाठी ५ नवे नियम, एकही मोडला तर होणार दंड, आताच नोट करा

CNG-PNG Price Drop: नवीन वर्षात आनंदाची बातमी! CNG-PNG झाला स्वस्त; आजचे पेट्रोलचे दर काय?

SCROLL FOR NEXT