Sakshi Sunil Jadhav
होमगार्ड पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर झाली असून अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर सुरू आहे. होमगार्ड बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता 18 डिसेंबरपूर्वी लवकरात लवकर अर्ज करावा.
अधिकृत नोटिफिकेशननुसार, होमगार्ड भरतीसाठी मॅक्सिमम वयोमर्यादा 30 वर्षे आहे. किमान वय 18 वर्षे असावे.
उमेदवार यूपीपीआरपीबीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. दिलेल्या प्रक्रियेचे पालन केल्यास अर्ज सहज पूर्ण होऊ शकतो.
उत्तर प्रदेशात होमगार्ड पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर झाली आहे. अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर सुरू असून 18 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे.
भरतीसाठी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 30 वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयात शिथिलता देण्यात येणार आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. होमगार्ड भरतीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर अर्ज फॉर्म अचूकपणे भरावा. फॉर्म सबमिट केल्यानंतर तो डाउनलोड करून प्रिंट काढा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे अत्यावश्यक आहे.