Sakshi Sunil Jadhav
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब भिमराव आंबेडकर हे दादर येथील राजगृहामध्ये काही काळ राहिले होते.
दादर पूर्वेतील कॅफे कॉलनीमध्ये डॉ. आंबेडकर सकाळचा नाश्ता करायला येत असत. हा कॅफे तितकाच प्रसिद्ध आणि आजही लोकांच्या आवडीचा मानला जातो.
या ऐतिहासिक इराणी कॅफेची सुरुवात जवळपास 90 वर्षांपूर्वी झाली. 1934मध्ये या कॅफेची सुरुवात झाली आणि आज हा कॅफे ऐतिहासिक कॅफे म्हणून प्रसिद्ध आहे.
कॅफेचे मालक मिर्झा यांच्या आजोबांनीच बाबासाहेबांच्या मुलाच्या लग्नाची बिर्याणी बनवली होती.
माहिती समोर आल्यानंतर अनेक जण इथे येऊन फोटो-व्हिडिओ बनवू लागले. इथे अनेक दिग्गज मंडळी, कॉलेजचे स्टूड्स नेहमी येत असतात.
कीमा घोटाला, मावा केक, सुलेमानी चहा, ईरानी कबाब, बेरी पुलाव हे पदार्थ इथे विशेष लोकप्रिय आहेत.
100 ते 200 रुपयांत उत्तम नाश्ता मिळतो म्हणून सामान्य लोकांसाठी हे ठिकाण आजही प्रिय आहे.
अनेक ग्राहक गेली 10–15 वर्षे सातत्याने इथे येत आहेत. गायक अभिजीत सावंतसह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी येथे जेवणाचा आस्वाद घेतला आहे.
महापरिनिर्वाण दिन, जयंती, पुण्यतिथीच्या दिवशी हे कॅफे आंबेडकर अनुयायांनी भरलेलं दिसतं.