BMC Recruitment Saam Tv
naukri-job-news

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी सुरु आहे भरती; जाणून घ्या सविस्तर

BMC Recruitment 2025: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. टेलिफोन ऑपरेटर पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. मुंबई महानगरमालिकेत विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. (BMC Recruitment)

बृहन्मुंबई महानगरपालिकेत सार्वजनिक आरोग्य खाते क्षयरोग रुग्णालयाद्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे. टेलिफोन ऑपरेटर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील या भरतीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.या नोकरीसाठी वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे. १ वर्षासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला १४००० रुपये पगार मिळणार आहे.

बृहन्मुंबईतील या भरती मोहिमेत २ रिक्त पदे भरली जाणार आहेत. मुंबईतील क्षयरोग रुग्णालयासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही १ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी वैद्यकीय अधीक्षक, क्षयरोग रुग्णालय समूह, जेरबाई, वाडिया रोड, शिवडी, मुंबई ४०० ०१५ येथे अर्ज पाठवायचा आहे.

सेंट्रल बँकेत भरती

सध्या सेंट्रल बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सेंट्रल बँकेत झोन बेस्ड ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही centralbankofindia.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०२५ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holiday: खातेधारकांनो लक्ष द्या! 13 ऑगस्टला बँका बंद की सुरू? जाणून घ्या तुमच्या राज्यातील अपडेट...

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update : आंबोली-चौकुळच्या सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त खेळ

Fitness Tips: जिमला जाण्याची गरज नाही! फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी ‘या’ ७ सवयी लावा

Mumbai Police: ड्रग्ज खरेदी करताना पोलिसाला अटक, मुंबई पोलिस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT