BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; ६९० रिक्त जागा; पात्रता काय? अशा प्रकारे करा अर्ज

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंजिनियर पदासाठी ही भरती सुरु आहे. ६९० रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
BMC Jobs
BMC JobsSaam Tv
Published On

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरु आहे. नगर अभियंता खात्यात ही भरती केली जाणार आहे. ६९० रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. (BMC Recruitment)

BMC Jobs
MSRTC Job: एसटी महामंडळात नोकरीची संधी, २०८ रिक्त जागा, पात्रता फक्त १०वी पास; अर्ज कुठे अन् कसा कराल?

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयाद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीबाबत सविस्तर माहिती तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन चेक करु शकतात. या नोकरीसाठी १८ ते ४३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. सरकारी विभागात पर्मनंट नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे. कनिष्ठ अभियंता (सिव्हिल), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) पदासाठी भरती आहे.त्यानंतर स्थापत्य अभियंता पदासाठीही भरती सुरु आहे. (BMC Recruitment 2024)

BMC Jobs
GIC Job: भारत सरकारच्या 'या' कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; जाणून घ्या सविस्तर

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा. सिव्हिल इंजिनियर पदासाठी उमेदवाराने सिव्हिल आणि कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजीमध्ये डिप्लोमा केलेला असावा.तर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर पदासाठी उमेदवाराने इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा.

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२४ आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ही भरती परिक्षेद्वारे केली जाणार आहे. तुम्हाला ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे. (BMC Job News)

BMC Jobs
Government Job: जलसंपदा विभागात नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com