SBI Recruitment: स्टेट बँकेत नोकरी अन् कोट्यवधींचे पॅकेज; २५ पदांसाठी भरती; पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

SBI Recruitment 2024: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्टेट बँकेत मॅनेजर, झोनल हेड अशा पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
SBI Job
SBI JobSaam Tv
Published On

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे.बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे.

स्टेट बँकेत प्रमुख, झोनल हेड, रिजनल हेड, रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड, सेंट्रल रिसर्च टीम या पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी २८ ते ५० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. (SBI Recruitment 2024)

SBI Job
MSRTC Job: एसटी महामंडळात नोकरीची संधी, २०८ रिक्त जागा, पात्रता फक्त १०वी पास; अर्ज कुठे अन् कसा कराल?

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

स्टेट बँकेतील या नोकरीसाठी पदवीधर आणि पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करु शकतात. वेगवेगळ्या पदासाठी ही भरती जाहीर केली जाते.हेड पदासाठी उमेदवाराने ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करु शकतात. सेंट्रल रिसर्च टीम पदासाठी सीए, सीएफए, पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करु शकतात. (State Bank Of India Recruitment)

SBI Job
Government Job: जलसंपदा विभागात नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर

स्टेट बँकेत २५ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना संपूर्ण भारतात कोणत्याही शाखेत भरती केली जाईल.या नोकरीसाठी भरघोस पगार मिळणार आहे. हेड पदासाठी वार्षिक CTC १३५ लाख रुपये असणार आहे. झोनल हेड पदासाठी ८८.१० लाख रुपये पगार मिळणार आहे. रिजनल हेड पदासाठी ६६.४० लाख रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाउन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (State Bank Job)

SBI Job
Job Opportunity: पुण्यात टेक कंपन्यांची चलती; फ्रेशर्संना नोकरीची सुवर्णसंधी, पगारही मिळणार बक्कळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com