.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नववर्ष २०२५ सुरु होण्यास आता अवघा एकच महिना राहिला आहे. या नववर्षात पुणे हे जीसीसी,आयटी आणि नाँन टेक क्षेत्रातील नव्या नोकरभरतीचे हक्काचे ठिकाण ठरणार आहे. कारण येत्या काही महिन्यात या क्षेत्रात नव्या नोकरीच्या संधी निर्माण होणार असून, नवोदित कर्मचाऱ्यांना बक्कळ पैसा मिळण्याची दाट शक्यता टीमलीज डिजीटलच्या आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या सर्वेक्षण अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
या सर्वेक्षण अहवालानुसार, पुण्यातील सर्वाधिक वेतन असलेल्या टेक रोजगारांमध्ये प्रतिवर्ष १८.५ लाख व १४.८ लाख रूपयांच्या वेतनासह प्रॉडक्ट मॅनेजमेंट व डेटा सायन्सचा समावेश आहे. तसेच डेटा इंजीनिअरिंग, डेव्हऑप्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा अॅनालिटिक्स आणि क्लाऊड कम्प्युटिंगमधील पदे प्रतिवर्ष ७.३ लाख रूपयांपासून प्रतिवर्ष ८.८ लाख रूपयांपर्यंत उत्तम स्पर्धात्मक वेतन कर्मचाऱ्यांना मिळू शकते.
गेल्या काही वर्षांपासून देशातील वाढते सायबर धोके आणि कंपनीचा डेटा व पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्याची गरज यामुळे सायबर सिक्युरिटी व नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेशन हे लक्षवधेक करिअर पर्याय आहेत. आयटी पायाभूत सुविधांच्या संरक्षणाची खात्री घेणारे महत्त्वपूर्ण क्षेत्र सायबर सिक्युरिटी व नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेशन डोमेनमध्ये जीसीसी प्रतिवर्ष ९.५७ लाख रूपयांच्या सरासरी वेतनासह अग्रस्थानी असण्याची अपेक्षा आहे. तसेच आयटी प्रॉडक्ट्स अँड सर्विसेस प्रतिवर्ष ६.८३ लाख रूपये आणि नॉन-टेक क्षेत्रे प्रतिवर्ष ५.१७ लाख रूपये वेतन मिळण्याची शक्यता आहे.
विविध क्षेत्रांमधील टेक पदांच्या स्थितीबाबत सांगताना टीमलीज डिजिटलच्या उपाध्यक्ष मुनिरा लोलीवाला म्हणाल्या, ''भारतातील टेक रोजागर बाजारपेठेत झपाट्याने बदल होताना दिसत आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी आमच्या डेटामधून निदर्शनास येते की, पुणे प्रबळ पायाभूत सुविधा आणि कुशल टॅलेंट समूह असलेले प्रमुख शहर म्हणून उदयास येत आहे. आयटी सर्विसेसमध्ये गेल्या २ ते ३ वर्षांत फ्रेशर व एण्टी-लेव्हल हायरिंगसंदर्भात मंदीचे वातावरण दिसण्यात आले असले तरी ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (जीसीस) आणि नॉन-टेक क्षेत्रे तरूण टॅलेंटचे स्वागत करण्यासाठी आणि मोठ्या संधी देण्यासाठी ध्वजवाहक ठरले आहेत.
याचे श्रेय १.६६ दशलक्षहून अधिक कर्मचारी असण्यासोबत जागतिक दर्जा कायम राखण्याप्रती प्रयत्न करणाऱ्या भारतातील जीसीसींच्या झपाट्याने विस्तारीकरणाला जाऊ शकते. पुण्यातील उद्योगांमध्ये प्रॉडक्ट मॅनेजमेंट व डेटा सायन्सप्रती मागणी वाढत आहे. ज्यामुळे टॅलेंटसाठी व्यापक संधी निर्माण होत आहेत. पुण्यातील जीसीसी, आयटी व नॉन-टेक क्षेत्रांमधील कंपन्या त्यांच्या टॅलेंट संपादन धोरणांना विकसित करत असल्यामुळे उमेदवारांना उद्योग गरजांशी संलग्न असलेल्या हायब्रिड कौशल्यांसह ससज्ज होण्याची मोठी संधी आहे.''