Digital Arrest Scam: सायबर ठगाकडून महिलेकडून उकाळले लाखो रुपये; डिजिटल अरेस्ट करत केलं विवस्त्र

Digital Arrest Scam: सायबर ठगांनी मुंबईमधील एका २६ वर्षाच्या महिलेला लाखो रुपयांचा गंडा घातलाय. सायबर ठगांनी आधी दिल्ली पोलीस असल्याचा बनाव करत आधी या महिलेला धमकावलं.
Digital Arrest Scam In Mumbai
Digital Arrest ScamIndia Today
Published On

मुंबईत सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. बोरिवली पूर्व परिसरात राहणाऱ्या आणि फार्मा कंपनीत काम करणाऱ्या २६ वर्षीय महिलेला सायबर गुन्हेगारांनी लाखो रुपयांचा गंडा घातलाय. सायबर गुन्हेगारांनी व्हिडीओ कॉल करत आधी तिला विवस्त्र होण्यास भाग पाडलं. त्यानंतर 1.78 लाख रुपये तिच्याकडून उकाळले.

सायबर ठगांनी आधी दिल्ली पोलीस अधिकारी असल्याचे सांगत महिलेशी संबंध ठेवले. त्याने महिलेला सांगितले की तिचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात आले आहे. ज्याचा संबंध नरेश गोयल यांच्याशी आहे. तपासात तातडीने सहकार्य करावे, अन्यथा अटक करू, अशी धमकी या गुंडांनी दिली आणि पैसे उकाळले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 19 ते 20 नोव्हेंबर 2024 दरम्यान घडल्याचे महिलेने तक्रारीत म्हटलंय. गुंडांनी वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून तिला धमकावले आणि हॉटेलची रूम बुक करण्यास सांगितले.तेथे महिलेला व्हिडिओ कॉल केला. त्यानंतर बँक खाते पडताळणीच्या नावाने 1.78 लाख ट्रान्सफर करण्यास सांगितले. इतकेच नाही तर 'बॉडी व्हेरिफिकेशन'च्या बहाण्याने त्याने महिलेला तिचे कपडे काढण्यास भाग पाडले.

Digital Arrest Scam In Mumbai
Mumbai Crime : जादूटोणा केल्याचा बनाव करत, मुंबईत 16 वर्षीय विद्यार्थीनीवर टॅक्सी चालकाचा अत्याचार 

यासर्व प्रकाराने महिला प्रचंड घाबरली आणि नंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली. या महिलेची तक्रार दहिसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अंधेरी पोलीस स्टेशनकडे ही केस वर्ग करण्यात आली. भारतीय दंड संहितेच्या कलम 319(2), 318(4), 204, 74, 78, 79, 351(2) आणि IT कायद्याच्या कलम 66(a) आणि 65(d) अंतर्गत या गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.

Digital Arrest Scam In Mumbai
Chattisgarh : धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर 3 शिक्षकांचा सामुहिक बलात्कार, ब्लॅकमेल करून आठवडाभर केला अत्याचार

दरम्यान पोलीस आता या अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेताहेत. या प्रकरणामुळे सायबर गुन्हेगार लोकांना घाबरवून त्यांची फसवणूक कशी करत आहेत, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय. सायबर गुन्हेगारी टाळण्यासाठी कोणत्याही अनोळखी कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका. कोणी पोलीस किंवा अधिकारी असल्याचे भासवून पैसे मागितल्यास तत्काळ पोलिसांना कळवा,असा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com