Pod Taxi in Mumbai: पॉड टॅक्सी काय आहे, कुठे आणि कशी धावणार, A टू Z माहिती एका क्लिकवर

Mumbai: मुंबई, उपनगरांतील लाखो प्रवासी रोज बीकेसीत नोकरीसाठी जातात. पण तिथं पोहोचायचं तर मोठं दिव्य असतं.
Pod Taxi
Pod Taxi in Mumbaiyandex
Published On

मुंबई, उपनगरांतील लाखो प्रवासी रोज बीकेसीत नोकरीसाठी जातात. पण तिथं पोहोचायचं तर मोठं दिव्य असतं. त्यात बीकेसीत जायचा खर्च तर प्रचंड आहे. रिक्षा, कॅब कशानंही जा. चौपट पैसे मोजावे लागतात. बेस्ट बसनं जायचं तर ट्रॅफिकचा त्रास. पंधरा ते वीस मिनिटांच्या प्रवासासाठी कधी-कधी पाऊण ते एक तासही लागतो. पण आता बीकेसीला पोहोचणं सुखकर होणार आहे.

सामान्यांना होणाऱ्या नाहक त्रासापासून सुटका करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात पॉड टॅक्सी प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. या पॉड टॅक्सीच्या मार्गावर ३८ स्थानकं प्रस्तावित आहेत. ही स्थानके अगदी जवळजवळ असतील. यासह प्रत्येक महत्वाच्या इमारतींना जोडलेले असतील. पॉड टॅक्सीला जोडले जाणारी स्थानके नक्की कोणती? यामुळे सामन्यांचा वेळ आणि पैसे वाचणार का? हे जाणून घेऊयात.

Pod Taxi
Numerology: १ ते ९ मूलांक असणाऱ्यांचा आजचा दिवस कसा जाणार? अंकशास्त्रानुसार वाचा तुमचं राशीभविष्य

पॉड टॅक्सीमधून प्रवास कसा आणि कुठपर्यंत?

मिड डेच्या रिपोर्टनुसार, बीकेसीतील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी, एमएमआरडीएने टेक्नो- इकॉनॉमिक फिजीबिलीटी स्टडी केला. त्यावेळी मे.टाटा कन्सलन्टींग इंजिनिअर्स संस्थेने या ठिकाणी पॉड टॅक्सी उभारण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार सप्टेंबर महिन्यात पॉड टॅक्सी कशी असेल याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच पॉड टॅक्सीचा थांबा नेमका कुठे असणार? कुठून - कुठपर्यंत धावणार? याची माहिती देण्यात आली आहे.

पॉड टॅक्सीसाठी २०२७ पर्यंत ३८ स्थानके तयार करण्यात येईल. २०४१ पर्यंत ५४ स्थानके उभारण्यात येणार असल्याचं, TEFS यांनी माहिती दिली आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा वांद्रे-कुर्ला उपनगरीय रेल्वे स्थानकांना जोडला जाईल. प्रत्येक रेल्वे स्थानकाला लागून दोन मुख्य टर्मिनल असतील. ज्यात प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, ओएनजीसी बिल्डिंग, गोदरेज बीकेसी, जीओ वलर्ड सेंटर, भारत डायमंड बोर्स, सेबी, एनएसई, फॅमिली कोर्ट आणि कलानगर जंक्शन यासह इतर अधिक ठिकाणांशी जोडला जाईल.

कसा असेल मार्ग ?

८. ८ किमीमध्ये ३८ स्थानके असतील. विशेष पॉड टॅक्सीसाठी, SGMPT १,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून ३८ स्थानके बांधली जाणार आहेत. TEFS नुसार, संपूर्ण कॉरिडॉरमध्ये १३.५ किलोमीटरमध्ये ५४ स्थानके असतील, ज्यामध्ये वांद्रे, कुर्ला आणि सायन रेल्वे स्टेशनवर तीन टर्मिनल असतील. MTNL आणि NABARD मधील दोन इंटरचेंज आणि २०४१ पर्यंत ४९ स्टेशन उभारण्यात येतील.

पॉड टॅक्सीने ट्रॅफिकधून होणार सुटका

बीकेसीमधील पॉड टॅक्सीबद्दल अधिकारी म्हणतात, 'बीकेसीमध्ये पॉड टॅक्सी चालवण्याचा निर्णय मेट्रो, ट्राम आणि अगदी बस यासारख्या इतर पर्यायांचा विचार केल्यानंतर घेण्यात आला आहे. खरंतर, बीकेसी वांद्रे आणि कुर्ला स्थानकाबाहेरील भागातील रस्ते अगदीच अरुंद आहेत. ज्यामुळे सामान्य लोक बीकेसीच्या बाहेर पडताच, ट्रॅफिकमध्ये अडकतात. शिवाय वेळेवर बस आणि ऑटो रिक्षा नसल्यामुळे सामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पॉड टॅक्सीमुळे वेळेची बचत होईल. ज्याचा फायदा ४-६ लाख प्रवाश्यांना नक्कीच होईल.'

पॉड टॅक्सीचे फायदे काय?

बीकेसीपर्यंत पोहचण्यासाठी आपण बस, ऑटो रिक्षा किंवा कॅबचा वापर करतो. पण वाहनांतून निघणाऱ्या धुरामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. मात्र पॉड टॅक्सीने आपले आरोग्यदेखील सांभाळले जाणार आहे.

1.पॉड टॅक्सी सुरू झाल्यामुळे श्वसनाचे विकार, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीत समस्या दूर होतील.

2. ऑटो आणि टॅक्सीचा कमी वापर केल्यामुळे पर्यावणावर सकारात्मक परिणाम होईल. परिणामी वैद्यकीय खर्च वाचेल.

3. अपघातांचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी होईल.

4. ज्यांना रोजची ऑटो, कॅब किंवा टॅक्सी परवडत नाही, त्यांच्यासाठी पॉड टॅक्सी खिशाला परवडणारी ठरेल.

5. दिव्यांगांसाठी पॉड टॅक्सी अधिक सुलभतेची ठरेल.

Pod Taxi
Mental Health : सतत नकारात्मक विचार येतात का? मानसिक आरोग्यासाठी फॉलो करा या टिप्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com