Numerology: १ ते ९ मूलांक असणाऱ्यांचा आजचा दिवस कसा जाणार? अंकशास्त्रानुसार वाचा तुमचं राशीभविष्य
तुमच्या नावाप्रमाणे तुमची राशी असते त्याचप्रमाणे तुमचे ज्योतिष अंक सुद्धा असतात. यालाच मुलांक म्हणतात. ज्योतिषशास्त्राप्रमाणे तुमच्या मुलांकावरून तुमचा चांगला वाईट स्वभाव, तुमचे व्यक्तीमत्व कळू शकते. अंकशास्त्रानुसार तुमचा मुलांक काढण्यासाठी तुमची जन्म तारीख, महिना साल आणि अंक लक्षात घेणे महत्वाचे असते. त्यावरून जो तुमचा नंबर येईल तो लकी नंबर असतो. उदा. ७, १६ आणि २९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा रेडिक्स क्रमांक ७ असतो. चला तर जाणून घेऊ १ ते ९ मुलांक असलेल्या लोकांसाठी ३ डिसेंबरचा दिवस कसा असणार आहे.
अंकशास्त्रानुसार डिसेंबरचे राशीभविष्य
मुलांक १
मुलांक क्रमांक 1 असणाऱ्या आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या. वैद्यकीय खर्चात वाढ होईल. वडिलांच्या तब्येतीचीही काळजी घेणे आवश्यक आहे. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.
मुलांक २
ज्या व्यक्तींचा मुलांक २ आहे त्यांचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. कामात त्यांना भरभरून यश मिळेल. तर दुसरी कडे खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे. प्रवास अधिक होईल.
मुलांक ३
मुलांक ३ असलेल्या व्यक्तींचा आजचा दिवस आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्यात जाणार आहे. अतिरिक्त खर्च होईल. आजूबाजूला अधिक धावपळ होईल. मित्राच्या मदतीने उत्पन्न वाढू शकते. जास्त टेंशन घेणे टाळा.
मुलांक ४
४ क्रमांकाच्या लोकांनी त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे. तुम्हाला तुमच्या नोकरीत अधिका-यांचे सहकार्य मिळेल आणि अतिरिक्त जबाबदारीही मिळू शकते. तब्येत सुधारेल. नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.
मुलांक ५
५ क्रमांकाच्या लोकांच्या व्यक्तींनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आज फायदेशीर ठरेल. नोकरीत मोठे पद मिळू शकते. उत्पन्न वाढेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. लेखन इत्यादी बौद्धिक कार्यात सन्मान मिळेल.
मुलांक ६
मुलांक ६ असणाऱ्यांनी जोडीदाराची काळजी घेणे योग्य ठरेल. वडिलांच्या तब्बेतीवर नजर असुद्या. उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. कामाचा ताण वाढू शकतो.
मुलांक ७
ज्या व्यक्तींचा मुलांक ७ असेल त्यांनी कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. व्यवसाय अडचणी आल्याने निराश होणे टाळा. जवळच्या व्यक्तींकडून पैसे मिळू शकतात. व्यवसायासाठी तुम्ही कुटुंबापासून लांब जाल.
मुलांक ८
मुलांक ८ असणाऱ्यांनी नोकरीत चांगलीच बाजी मारली असेल. नवीन व्यवसायात सुरू करू शकता. वाहने चालवणे धोक्याचे ठरेल.
टीप: वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
Written By: Sakshi Jadhav

