Negative Energy: घरातल्या 'या' चुकांमुळे येऊ शकते पैशांची अडचण; वाचा काय आहेत यावर प्रभावी उपाय

Vastu Shastra: कधी कधी घरात अनेक प्रकारच्या समस्या कायम राहतात. त्याने आपले जगणे कठीण होऊन बसते.
Vastu Shastra
Vast Tipsyandex
Published On

कधी कधी घरात अनेक प्रकारच्या समस्या कायम राहतात. त्याने आपले जगणे कठीण होऊन बसते. जसे की, घरातील काही सदस्य नेहमी आजारी राहतात, काही वेळेस पैसाच टिकत नाही. यासोबतच घरात सतत भांडणं होत असतात. आर्थिक समस्यांवर उपाय करूनही या सर्व समस्यांपासून सुटका होऊ शकत नाही. कुठेतरी ही सर्व लक्षणे वास्तुदोषांमुळे असू शकतात. जर तुम्ही तुमच्या घरातील वस्तूंशी संबंधित काही उपाय केले तर घरातील सकारात्मक ऊर्जा वाढू शकते. वास्तुदोषांशी संबंधित उपायांचा अवलंब केल्यास घरामध्ये होणाऱ्या या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. पुढे जोतिषशास्त्राचे प्रभावी उपाय दिले आहेत.

देवघरचे ज्योतिषी काय म्हणतात?

देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुदगल यांनी असे सांगितले की, वास्तू दोषांचा आपल्या जीवनावर नक्कीच परिणाम होतो. घरामध्ये वास्तुदोष असल्यास कोणत्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात? घरामध्ये वास्तू दोषाची अनेक कारणे असू शकतात. जसे, घरामध्ये काटेरी झाडे लावणं, घराच्या नळातून नेहमी पाणी येत राहणं, तुळशीचे रोप सुकणं, ही सर्व कारणे वास्तू दोषाची आहेत. या गोष्टींमुळे घरात नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात संचारते.

Vastu Shastra
हिवाळ्यात त्वचा कोरडी होतेय? 'हे' फळ तुमच्या त्वचेला ठेवेल टवटवीत, रोज करा सेवन

घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी उपाय

काटेरी झाडे काढा

ज्योतिषी सांगतात की, घरात कोणत्याही प्रकारची काटेरी झाडे लावायचे टाळा. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. काही हिरवीगार झाडे लावा म्हणजे सकारात्मक उर्जा संचारते. तुम्ही झेंडूच्या फुलांचे झाड लावणे खूप शुभ ठरू शकते.

सुकलेले तुळशीचे रोप

तुळशीचे रोप लक्ष्मीचे रूप मानलं जातं आणि त्याची दररोज पूजा केली जाते. मात्र जे तुळशीचे रोप सुकले आहे, ते ताबडतोब घरातून काढून टाकायला हवे. अन्यथा घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊन अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्ही तुळशीला कमी उन्हात ठेवा आणि सतत पाणी देत राहा.

कबुतराचे घरटे काढा

सहसा पक्षी घरटे बांधतात हे वास्तु दोषाचे लक्षण आहे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि अशुभही मानले जातं. त्यामुळे घरात कधीही कबुतराचे घरटे ठेवू नका. कबुतराचे घरटे तुमच्या आजूबाजूच्या परिसरातही ठेवणे टाळा.

ब्रह्मस्थानात जड वस्तू ठेवू नका

ज्योतिषी सांगतात की, घराच्या मध्यभागी, कोणत्याही घराच्या ब्रह्मस्थानात जड वस्तू ठेवू नयेत. यामुळे घराच्या ब्रह्मस्थानात तुळशीचे रोप असेल तर ते घर मंदिर बनते. नेहमी सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Written By: Sakshi Jadhav

Vastu Shastra
Chole Puri Recipe: रोजची पोळी भाजी खाऊन कंटाळा आलाय? तर टिफीनसाठी बनवा १५ मिनिटांत छोले पुरी रेसिपी

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com