हिवाळ्यात त्वचा कोरडी होतेय? 'हे' फळ तुमच्या त्वचेला ठेवेल टवटवीत, रोज करा सेवन

ऋतूनुसार जी फळे किंवा भाज्या बाजारात येतात त्यांचे सेवन करणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते.
sweet potato benefits for dry skin
dry skin tipsyandex
Published On

रताळे खाण्याचे फायदे

हिवाळ्यात रताळे खाल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात. रताळ्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा हिवाळ्यातच होतो. हिवाळ्यात रताळे खाल्याने शरीर उबदार राहते. त्यासह त्वचा कोरडी होण्यालपासून सुद्धा वाचते. रताळ्यातील गुणधर्मांमुळे शुगर, बीपी यांसारख्या समस्यांपासून बचाव होतो. चला तर जाणून घेऊ शरीराला आणखी काय फायदा होतो?

हिवाळ्यात अनेक फळे आणि भाज्या उपलब्ध असतात. त्यांचे सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. अशीच एक भाजी म्हणजे रताळे. रताळ्याला इंग्रजीत स्वीट पोटॅटो असेही म्हणतात. रताळ्यामध्ये हेल्दी फॅट, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी 6 सारखे अनेक पोषक घटक आढळतात. जे हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यास आणि साखर, बीपी आणि कोरडी त्वचा यांसारख्या अनेक समस्यांपासून संरक्षण करण्यास मदत करते.

sweet potato benefits for dry skin
Mosambi: मोसंबी रोज खाणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

पचनक्रिया सुधारणे

रताळ्यांमध्ये असलेले उच्च फायबर पाचन समस्या दूर करण्यास मदत करते. हिवाळ्यात रताळे खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात रोज 1 ते 2 रताळ्याचे तुकडे खाल्ल्याने बद्धकोष्ठता, ऍसिडिटी आणि पोटदुखी सारख्या समस्या होतात.

कोरडी त्वचा

थंड हवामानात त्वचा अनेकदा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते. त्वचेला काही हलके खरचटल्यास त्वचा पांढरी दिसते. अशा परिस्थितीत रताळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए, ई आणि सी त्वचेला आतून पोषण देऊन कोरडेपणाची समस्या दूर करण्यास मदत करतात. रताळ्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेच्या सुरकुत्यांचे प्रमाण कमी करतात.

उच्च रक्तदाब

रताळे खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही दूर होतो. यामध्ये असलेले फायबर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. तर पोटॅशियममुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून आराम मिळतो.

शरीरातील लोहाचे प्रमाण

शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे, ऊर्जा नष्ट होते. ज्याचा प्रतिकारशक्तीवर देखील नकारात्मक परिणाम होतो. रताळ्यामध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. अशा परिस्थितीत रताळ्याचे दररोज सेवन केल्यास शरीरातील लोहाची कमतरता दूर होण्यास मदत होते.

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांसाठी रताळे फायदेशीर आहे. रताळे रक्तातील साखर आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता नियंत्रित करू शकतात. रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ज्यामुळे त्यांचा रक्तातील साखरेच्या पातळीवर कमी परिणाम होतो. हे मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते. पांढऱ्या सालाच्या रताळ्याचे सेवन केल्याने मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Written By: Sakshi Jadhav

sweet potato benefits for dry skin
Chole Puri Recipe: रोजची पोळी भाजी खाऊन कंटाळा आलाय? तर टिफीनसाठी बनवा १५ मिनिटांत छोले पुरी रेसिपी

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com