ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतात कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आपल्या आहारात सुद्धा बदल करावा लागणार आहे.
थंडीच्या दिवसात तुम्हाला चांगले आरोग्य पाहिजे असेल तर काही मुख्य भाज्यांचा समावेश आहारात करणे महत्वाचे आहे. त्या भाज्यांची यादी पुढील प्रमाणे आहे.
पालकच्या भाजीचे सेवन थंडीच्या दिवसात केल्याने शरीराला अनेक प्रमाणात फायदा होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
कोबी या पालेभाजीत व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. तुम्ही कोबीचे सुप सुद्धा पिऊ शकता.
थंडीत बटाटा हा उत्तम पर्याय आहे. याने शरीराला आयर्न, व्हिटॅमिन ए, सी , कॅल्शियम मिळतात.
शेवग्याची डाळ किंवा भाजी शरीराला पुरेसे पोषण मिळवून देतात. त्याने शरीराच्या तापमानावर नियंत्रण राहते.
गाजरात व्हिटॅमिन, ए, बी, सी मोठ्या असते. त्यामुळे आपली हाडे मजबूत होतात.