ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जागतिक पॉप स्टार दुआ लिपा मुंबईकरांना भुरळ घालणार आहे. 30 नोव्हेंबरला ZFIC मध्ये तिचा शो होत आहे.
ग्रॅमी पुरस्कार विजेती गायिका दुआ लिपा हीचा कॉन्सर्ट शनिवारी मुंबईच्या बीकेसीमध्ये होत आहे.
2017 मध्ये तिच्या स्व-शीर्षक असलेल्या पहिल्या अल्बमपासून तिच्या प्रसिद्धीची सुरुवात झाली.
दुआ लिपाचा हा भारतातला दूसरा कॉन्सर्ट आहे. मुंबईच्या बीकेसीमधील एमएमआरडीए मैदानावर या कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं आहे.
या कॉन्सर्टचा उद्देश देशातील वंचित भागात अन्न वितरणास प्रोत्साहन देण्यासाठी पैसा आणि जागरूकता वाढवण्याचा आहे.
दुआ लिपाच्या कॉन्सर्टचं बुकिंग ऑगस्टमध्ये सुरू झालं होतं. काही मिनिटांतच ही तिकीटं विकली गेली.
दुआ लिपा सह फीडिंग इंडिया कॉन्सर्टच्या तिकिटांची किंमत रु. 10 हजार आहे. हे तिकीट तीन श्रेणींमध्ये वर्गीकृत आहे.
सिल्व्हर-फायनल फेज तिकीट 10 हजार रुपयांना उपलब्ध आहे. तर गोल्ड आणि लाउंज तिकिटांची किंमत अनुक्रमे 17 हजार आणि 45 हजार रुपये इतकी आहे.
NEXT: जगातील हे 5 पक्षी पंख असून उडत नाहीत