ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाला वाटत असतं पक्षी म्हणजे उडणाराच असतो. मात्र जगात असे पक्षी आहेत जे पंख असून उडत नाहीत.
पेंग्विन हा एक पक्षी आहे ज्याला पंख आहेत मात्र तो उडू शकत नाही. पेंग्विन तासनतास पाण्यात राहून शिकार करतात आणि पोहण्यात खूप पारंगत असतात.
ऑस्ट्रेलियातील इमू पक्षी जगातील सर्वात मोठ्या पक्ष्यांपैकी एक आहे. पंख असले तरी इमू पक्षी उडू शकत नाही. मात्र तो जमिनीवर खूप वेगाने धावू शकतो.
गुआम रेल हा एक छोटा पक्षी आहे ज्याला पंख आहेत, पण उडता येत नाही. हा पक्षी बहुतेक वेळा जमिनीवरच राहतो. त्याचा आकार लहान असूनही जमिनीवर अतिशय चपळपणे फिरतो.
ताकाहे हा न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावर आढळणारा पक्षी आहे. त्याला पंख आहेत, पण ते उडू शकत नाही. तो आपले आयुष्य जमिनीवरच घालवतो.
काकापो हा अतिशय विचित्र दिसणारा पक्षी आहे. हा उडू शकत नाही तो जमिनीवर चालतो आणि रात्री अन्न शोधतो.