Chole Puri Recipe: रोजची पोळी भाजी खाऊन कंटाळा आलाय? तर टिफीनसाठी बनवा १५ मिनिटांत छोले पुरी रेसिपी

Tiffin Box Recipe: छोळेची भाजी ही चवीला उत्तम असते. त्याचप्रमाणे ती बनवायला सुद्धा सोपी असते.
Tiffin Box Recipe
Chole Puri Recipesaam tv
Published On

छोले पुरी रेसिपी

छोळेची भाजी प्रत्येकालाच आवडते. छोळे कडधान्यांमध्ये येतात. तुम्ही छोलेची भाजी पुरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता. रोज तुम्ही ज्या भाज्या बनवता त्यांना फार कमी वेळ लागतो. तशीच ही छोले पुरी रेसिपी सुद्धा आहे. हे या रेसिपीचे वैशिष्ट सुद्धा आहे. चला तर जाणून घेऊया रेसिपी. या रेसिपीचे प्रमाण सहा ते सात लोकांसाठीचे आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता.

छोले पुरी बनवण्याचे साहित्य

350 ग्रॅम उकडलेले छोले

2 कांदा

2टोमॅटो मॅश केलेला

1 टीस्पून डाळिंब

२ चमचे आले लसूण पेस्ट

1 टीस्पून गरम मसाला पावडर

1/2 मिरची पावडर

२ चमचे कोरड्या आंब्याची पावडर

१/२ टीस्पून हळद पावडर

१/२ जीरे

६ तेजपत्ता

३ चमचे धणे पावडर

4-5 हिरवी मिरची

1 टेबलस्पून शुद्ध तेल

1 टीस्पून चहाचे पान

१ मध्यम आकाराचे किसलेले बटाटे

1 टीस्पून छोले मसाला

1 टीस्पून गरम मसाला

चवीनुसार मीठ

Tiffin Box Recipe
Veg Bombil Fry: व्हेज खाणाऱ्यांसाठी स्पेशल डिश; फक्त १० मिनिटात तयार करा व्हेज बोंबिल फ्राय रेसिपी

पुरी बनवण्यासाठी साहित्य

१/२ कप गव्हाचे पीठ

२ चमचे शुद्ध तेल

२ चमचे मीठ

आवश्यकतेनुसार पाणी

आवश्यकतेनुसार पुरी तळण्यासाठी तेल

1 टीस्पून लोणचे

२ चमचे दही

१ चिरलेला कांदा

छोले पुरी बनवण्याची कृती

सर्वप्रथम छोले आणि बटाटे 5 ते 6 तास भिजत ठेवा, नंतर छोले कुकरमध्ये पाण्यात अ‍ॅड करा. आता दोन चमचे मीठ मिक्स करून पाच ते सहा शिट्ट्या काढून छोले शिजवून घ्या. आता एका भांड्यात सर्व मसाले काढा. त्यात बारिक कांदा, टोमॅटो , मसाले, आणि उकडलेला बटाटा किसून घ्या.

पुढे फोडणीसाठी एक मोठा टोप घ्या किंवा कुकरमध्येच तुम्ही फोडणी देऊ शकता. त्यात घाला, तेल गरम करा आणि कांदा परतून घ्या. मग त्यात सर्व जिन्नस एकत्र करून फोडणी द्यायला सुरूवात करा. मॅश केलेला टोमॅटो,बटाटा अ‍ॅड करा आणि मंद आचेवर शिजवा.

आता सर्व मसाले मिक्स करून छान परता. कढईत ४ ते ५ हिरव्या मिरच्या, एक कप पाणी, एक चमचा चहाची पाने अ‍ॅड करून उकळा. मग तुम्ही उकडलेले छोले त्यात मिक्स करून उकळी आल्यावर गॅस बंद करा.

आता पुरी बनवण्यासाठी तुम्ही एका परातीत पीठ, मीठ आणि तेल अ‍ॅड करून घट्ट कणीक मळून घ्या. आणि लहान गोळे करून लाटा. आता एक कढई घ्या.त्यात तेल तापवून घ्या. गॅस मध्यम आचेवर असू द्या. आता एक एक पुरी छान तळून घ्या. तळताना पुरीला जास्त ढवळू नका. चला तयार आहेत गरमागरम छोले पुरी तयार.

Written By: Sakshi Jadhav

Tiffin Box Recipe
Mosambi: मोसंबी रोज खाणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com