
संडे हा सगळ्यांचाच नॉनव्हेज खाण्याचा दिवस असतो. सगळे मिळून आज काय नॉनव्हेज खायचं? हे सकाळी उठल्या उठल्या प्लॅन करतात. त्यामुळे घरच्या गृहीणी सुद्धा संडेला काय बनवायचं? या प्रश्नात जास्त अडकत नाहीत. पण जे लोक प्युयोर व्हेज खाणारे असतात त्यांच्यासाठी आम्ही एक सुंदर रेसिपी आणली आहे. ही रेसिपी कोळी समाजात जास्त प्रमाणात केली जाते. तुम्ही अळू वडीच्या पानांपासून व्हेज बोंबिल तयार करू शकता. चला पाहूया ही आगळीवेगळी रेसिपी.
साहित्य
अळूवडीच्या पानांचे दांडे
तेल
अदरक लसूणची पेस्ट
लिंबाचा रस
हळद
मसाला
मीठ
रवा
सर्वप्रथम अळीवडीच्या पानांचे दांडे स्वच्छ धुवून पुसून घ्या. आता हाताला तेल लावून त्याला सोला. मग कापलेले दांडे एका कुकरमध्ये घेवून त्यात दोन ग्लास पाणी आणि चिंच किंवा कोकम मिक्स करून उकळून घ्यायचं आहे. दांडे हलके मऊ झाले की, तुम्ही गॅस बंद करा. आता एका मोठ्या परातीत अदरक लसूणची पेस्ट घ्या त्यात लिंबाचा रस, हळद , मसाला, मीठ आणि रवा एकत्र करून तुम्ही कोट करून घ्या.
व्यवस्थित कोट झाल्यावर तुम्ही एका पॅनमध्ये आवश्यक तेल तापवून घ्या. तेल तापले की तुमचे कोट केलेले बोंबिल फ्राय करा. ज्या प्रकारे तुम्ही मच्छी फ्राय करता त्याच प्रकारे तुम्ही हे व्हेज बोंबिल फ्राय करू शकता. चला तर गरमा गरम फ्रेश व्हेज बोंबिल कांदा आणि लिंबूसोबत सर्व्ह करा.
Written By: Sakshi Jadhav