
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १०वी पास तरुणांना इंडिया पोस्ट ऑफिसरमध्ये नोकरी करण्याची संधी आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. भारतीय डाक विभागात स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. (Post Office Recruitment)
इंडिया पोस्ट ऑफिसच्या या नोकरीसाठी तुम्ही indiapost.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या भरती मोहिमेत २५ पदे भरली जाणार आहेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख८ फेब्रुवारी २०२५ आहे. मुदतीपूर्वी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.(Post Office Recruitment 2025)
स्टाफ ड्रायव्हर पदासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये भरती केली जाणार आहे. मध्य क्षेत्रात १ पदासाठी भरती केली जाणार आहे. दक्षिण भागात ४ पदांसाठी, पश्चिम भागात ५ पदांसाठी, चेन्नईत १५ पदांसाठी अशी एकूण २५ जागांसाठी भरती केली जाणार आहे.
भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत हलक्या आणि वजनदार वाहन चालवण्याचा अनुभव असायला हवा.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५६ वर्षे असावी.
या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला १९९०० रुपये पगार दिला जाणार आहे.या नोकरीसाठी अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रे ऑफिस ऑफ सिनियर मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिस, नंबर ३७, ग्रीम्स रोड, चेन्नई ६००००६ येथे पाठवायचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.