BMC Recruitment Saam Tv
naukri-job-news

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; पगार ६०००० रुपये; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

BMC Recruitment 2025: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची उत्तम संधी आहे.मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेक‍रिता ५१ पदे भरली जाणार आहेत.

Siddhi Hande

बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेक‍रिता क्षयरोद दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. १२वी पास ते एमबीबीएस पदवी प्राप्त केलेले उमेदवारांसाठी नोकरीची ही उत्तम संधी आहे. या नोकरीबाबत क्षयरोग नियंत्रण संस्थेद्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (BMC Recruitment 2025)

बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत (BMC Recruitment)५१ जागा भरती केली जाणार आहे. या नोकरीबाबत अधिकृत माहती तुम्हाला जाहिरातीत मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ७० वर्षे असावी.

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) पदासाठी उमेदवाराने एमबीबीएस पदवी प्राप्त केलेली असावी. सिनियर वैद्यकिय अधिकारी (एसआरएमओ) पदासाठी एमबीबीएस पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत रोटेटरी इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी. सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ पदासाठी उमेदवाराने एमडी मायक्रोबायोलॉजी किंवा पीएचडी इन मेडिकल मायक्रोबायोलॉजी केलेले असावे.

एपिडेमिओलॉजिस्ट पदासाठी एमबीबीएप पदवी प्राप्त केलेली असावी किंवा पीएचडी केलेली असावी.फार्मसिस्ट पदासाठी फार्मसीमध्ये पदवी किंवा डिप्लोमा केलेला असावा. लॅबोरेटरी तंत्रज्ञ पदासाठी १२वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. अजून अनेक पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २०,००० ते ६०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्हाला मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी, पहिला मजला,बावलवाडी म्युनिसिपल कार्यालय, व्होल्टास हाऊस समोर, चिंचपोकळी येथे पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT