BMC Recruitment 2024 Saam Digital
naukri-job-news

BMC Recruitment 2024: १८०० जागांसाठी बीएमसीमध्ये मेगाभरती; कसा कराल अर्ज, पात्रता काय अन् पगार किती?

BMC Job: मुंबई महानगर पालिकेमध्ये कार्यकारी सहायक पदासाठी बंपर भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत कार्यकारी सहायक पदांच्या १८४६ जागा भरल्या जाणार आहेत.

Priya More

नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई महानगर पालिकेमध्ये कार्यकारी सहायक पदासाठी बंपर भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत कार्यकारी सहायक पदांच्या १८४६ जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया २० ऑगस्ट म्हणजे आजपासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ सप्टेंबर आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावा. उमेदवारांनी मुंबई महानगर पालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा.

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर पालिकेमध्ये कार्यकारी सहायक (लिपिक) पदांसाठी बंपर भरती केली जाणार आहे. कार्यकारी सहायक या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या जागांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी महानगरपालिकेच्या वेबसाइटवरील https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकवर जाऊन अर्ज करावा.

अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ९ सप्टेंबरला रात्री ११.५९ वाजेपर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांनी भरती प्रक्रियेच्या जाहिरातीसोबत दिलेल्या सर्व मार्गदर्शक सुचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे आणि त्याचे काटेकोरपणे पालन करावे. ऑनलाइन अर्ज वेळत सादर करावे. तसेच भरलेल्या संपूर्ण अर्जाची प्रिंट काढून स्वत:जवळ ठेवावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

महत्वाच्या तारखा -

अर्ज करण्याची तारीख - २० ऑगस्ट २०२४

अर्ज करण्याची अंतिम तारीख - ९ सप्टेंबर २०२४

आरक्षणानुसार पदांसाठी भरती -

अनुसूचित जाती - १४२ जागा

अनुसूचित जमाती - १५० जागा

विमुक्त जाती- अ - ४९ जागा

भटक्या जमाती-ब - ५४ जागा

भटक्या जमाती-क - ३९ जाग

भटक्या जमाती-ड - ३८ जागा

विशेष मागास प्रवर्ग - ४६ जागा

इतर मागासवर्ग - ४५२ जागा

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक - १८५ जागा

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग - १८५ जागा

खुला प्रवर्ग - ५०६ जागा

वयोमर्यादा -

- अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवार १८ वर्षे ते ३८ वर्षे वयोमर्यादेतील असावा.

- मागास प्रवर्गातील उमेदवार १८ वर्षे ते ४३ वर्षे वयोमर्यादेतील असावा.

शिक्षण -

- उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.

- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा त्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा.

- उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT