Job Alert
Government JobSAAM TV

Government Job: अवघ्या ४०० रुपयांचे परीक्षा शुल्क भरून मिळेल सर्वोच्च न्यायालयात नोकरी

Job Alert For Supreme Court Jobs: भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सुप्रीम कोर्टात ज्युनियर कोर्ट अटेंडंट या पदांसाठी भरती जारी करण्यात आली आहे.
Published on

सुप्रीम कोर्टात ज्युनियर कोर्ट अटेंडंटच्या (कुकिंग) ८० पदांसाठी भरती जारी करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सामील होण्यासाठी, उमेदवार २३ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने भरता येतील. जे उमेदवार भरतीसाठी पात्र असतील त्यांनी SCI च्या अधिकृत वेबसाईट sci.gov.in वर जाऊन अर्ज भरू शकतात.

सुप्रीम कोर्टात ज्युनियर कोर्ट अटेंडंटच्या(कुकिंग) ८० पदांसाठी भरती जारी करण्यात आली

पात्रता काय?

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून 10वी/मॅट्रिक उत्तीर्ण

  • १ वर्षाचा पाककला डिप्लोमा आणि तीन वर्षांचा स्वयंपाकाचा अनुभव

  • उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षापर्यंत असावे.

  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाईल.

अर्जाचे शुल्क काय?

या भरतीमध्ये ऑनलाइन अर्ज भरण्यासोबतच उमेदवारांना शुल्कही जमा करणे बंधनकारक आहे. शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.

  • जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणींसाठी अर्ज शुल्क ४०० रुपये

  • एससी, एसटी आणि पीएच श्रेणींसाठी शुल्क २०० रुपये

Job Alert
Central Railway Recruitment : मध्य रेल्वेत २,४२४ पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू, दहावी पास उमेदवार करू शकतात अर्ज; जाणून घ्या सविस्तर

निवड प्रक्रिया कशी असेल?

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षेत सहभागी व्हावे लागेल. या परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना एक प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागेल. शेवटी उमेदवारांना मुलाखत प्रक्रियेत पास व्हावे लागेल.

  • लेखी परीक्षा - १०० गुण

  • प्रात्यक्षिक परीक्षा - ७० गुण

  • मुलाखत - ३० गुण

Job Alert
Central Bank of India: ७वी पास तरुणांना सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी;अशा पद्धतीने करा अर्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com