BMC Recruitment Saam Tv
naukri-job-news

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत १८४६ लिपिक पदांसाठी भरती; अर्ज करण्याची मुदत वाढली; जाणून घ्या सविस्तर

BMC Jobs Application Date Extended: बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल १८४६ लिपिक पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ आता वाढवण्यात आली आहे.

Siddhi Hande

BMC Jobs Latest Updates in Marathi: बृहन्मुंबई महानगरपालिकेत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १८४६ लिपिक पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. मुदतवाढीसोबतच काही अटीदेखील रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही ज्या उमेदवारांनी अर्ज केला नसेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

या भरतीसाठी दहावी आणि पदवी परिक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावे ही अट रद्द करण्यात आली आहे. त्याचसोबत पदवी परीक्षेत ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण यातील '४५ टक्के गुण’ ही अट देखील रद्द केली आहे. त्याचसोबत तुम्ही आता ११ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करु शकणार आहात.यापूर्वी प्रसिद्ध जाहिरातीनुसार परीक्षा शुल्क भरुन अर्ज केलेल्या अर्जदारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर किंवा https://bit.ly/3XxQNli या लिंकवर या भरतीबाबत जाहिरात देण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील रु. २५,५००-८१,१०० पगार देण्यात येणार आहे.कार्यकारी सहायक या संवर्गातील १ हजार ८४६ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती (१४२), अनुसूचित जमाती (१५०), विमुक्त जाती-अ (४९), भटक्या जमाती-ब (५४), भटक्या जमाती-क (३९), भटक्या जमाती-ड (३८), विशेष मागास प्रवर्ग (४६), इतर मागासवर्ग (४५२), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (१८५), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (१८५), खुला प्रवर्ग (५०६ ) याप्रमाणे रिक्त पदांसाठी आरक्षण देण्यात आले आहे.

याबाबत संपूर्ण माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी ९५१३२५३२३३ हा मदतसेवा क्रमांकही जारी करण्यात येत आहे. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान या क्रमांकावर उमेदवारांना संपर्क साधता येईल, असेही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT